जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
केंद्र सरकारने ,कर्नाटकचे पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांची सीबीआयच्या संचालक पदी नियुक्ती केलेली आहे. कर्नाटकचे पोलीस महासंचालक प्रवीण सूद हे 1986 तुकडीतले,( आय.पी.एस.) भारतीय पोलीस सेवेतले अधिकारी आहेत. सध्याचे विद्यमान सीबीआयचे संचालक सुबोध कुमार जयस्वाल यांचा, 2 वर्षाचा कार्यकाल 25 मे 2023 रोजी संपणार आहे .सध्याचे विद्यमान सीबीआयचे संचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्या जागी, कर्नाटकचे पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांची सीबीआयच्या संचालक पदी निवड केंद्र सरकारने केली आहे .कर्नाटक राज्यामध्ये पोलीस महासंचालक म्हणून प्रवीण सूद यांची कामगिरी व कारकीर्द फार उल्लेखनीय म्हणावी लागेल. कर्नाटक राज्यातील पोलीस महासंचालक असलेले प्रवीण सूद यांच्या कामगिरीची दखल, केंद्र सरकारने घेऊन ,त्यांची सीबीआयचे विद्यमान संचालक सुबोध कुमार जयस्वाल यांच्या जागी, संचालक पदी नेमणूक करण्यात आलेली आहे.