जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
गेल्या शुक्रवारी बंगालच्या उपसागरात दाखल झालेल्या मान्सूनने, आपला पुढील प्रवास सुखदरीत्या चालू केलेला असून, पूर्णतः बंगालचा उपसागर व्यापण्यास सुरुवात केलेली आहे. दरम्यान बंगालच्या उपसागराचे क्षेत्र हे फार मोठे असल्याने, मान्सूनला पूर्ण क्षेत्र व्यापण्यास 8 दिवसांचा कालावधी लागू शकतो. त्यानंतरच त्याचा प्रवास कर्नाटकाच्या राज्याकडे सुरू होतो. महाराष्ट्र राज्य विदर्भात काही भागात 22 मे 2023 ते 24 मे 2024 या दोन दिवसाच्या कालावधीत, काही ठिकाणी पाऊस पडण्याचा व राज्यातील उर्वरित भागात उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
उत्तर भारतातील तयार झालेल्या चक्रीवाताने ,मध्य प्रदेशात काही भागात पावसाची शक्यता व्यक्त केली गेली आहे .राज्यात विदर्भ वगळता, मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आदी काही जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहणार असून, कोकणला हवामान बदलाचा संभव दर्शवत आहे. भारतातील यंदाचा मान्सूनचा पाऊस केव्हा सुरू होतो ? या प्रतीक्षेत बळीराजा व नागरिकांची उत्सुकता राहिली आहे.