जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
सध्या परिस्थितीत सकारात्मक वातावरण निर्मिती झाली तर, यंदाच्या वर्षीचा मान्सून लवकरच केरळात धडकण्याची शक्यता असल्याचे प्रतिपादन भारतीय हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.डी.एस.पै यांनी केले आहे. भारतीय हवामान खात्याने घेतलेल्या शुक्रवार रोजीच्या ऑनलाइन पत्रकार परिषदेत, यंदाच्या वर्षीच्या मान्सून वर ते बोलत होते. यंदाच्या वर्षीच्या मान्सून वर अलनिनोचा कुठलाही परिणाम होणार नसल्याचे सांगून, भारतीय समुद्री स्थिरांक सध्याच्या परिस्थितीत मान्सूनच्या प्रगतीला पोषक असल्याने, जूनमध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता डॉ. डी. एस. पै यांनी व्यक्त केली.
सध्या अरबी समुद्रात बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग चांगला असून यापुढे तो असाच राहिला तर, 4 जून पर्यंत मान्सून केरळला धडकण्याची शक्यता आहे. सध्याच्या परिस्थितीत मान्सून पुढे सरकण्यासाठी पोषक वातावरण तयार होणे आवश्यक आहे. दुसऱ्या बाजूस प्रशांत महासागर व हिंदी महासागराच्या मध्यावर पावसाळ्यात अननिनो सक्रिय होण्याची शक्यता असून परंतु भारतीय समुद्री स्थिरांक हा पोषक असल्याने ,त्याचा कोणत्याही परिस्थितीत यंदाच्या वर्षीच्या मान्सूनवर परिणाम होणार नसल्याचे प्रतिपादन हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. डी. एस.पै यांनी केले आहे. यंदाच्या वर्षीचा मान्सून हा जूनमध्ये चांगल्या प्रमाणात पडणार असल्याने, शेतकरी वर्गाला चिंतेचे कारण नसून सर्वसाधारणपणे मान्सूनचा वर्षाव चालू झाल्यानंतर, किमान एक आठवडा वाट पाहून, दुसऱ्या आठवड्यात पेरणी करावी असे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. डी. एस. पै यांनी सांगितले आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.डी.एस.पै यांच्या निदानानुसार यंदाच्या वर्षीचा मान्सूनचा पाऊस, जून ते सप्टेंबर च्या दरम्यान 96% वर्षाव होणार असल्याचे म्हणणे आहे.