जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
सर्वोच्च न्यायालयात आज केंद्र सरकारकडून सूचित करण्यात आले की ,मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या दोषी व्यक्तींना, सध्याच्या फाशीच्या शिक्षा ऐवजी, कमी वेदना देणाऱ्या पद्धतीचा अवलंब करता येईल का? याचा विचार करण्यासाठी, तज्ज्ञांची समिती नेमण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती, ऍटर्नी जनरल आर.वेंकटरमणी यांनी आज सर्वोच्च न्यायालयात दिली. सर्वोच्च न्यायालयातील वकील अॅडवोकेट ऋषी मल्होत्रा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर ,ऍटर्नी जनरल आर. वेंकटरमणी यांनी आज सर्वोच्च न्यायालयात, केंद्र सरकारच्या तज्ज्ञांची समिती नेमण्याच्या निर्णयाची माहिती दिली.
आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठासमोर आज सुनावणी झाली. दरम्यान सर्वोच्च न्यायालयात या पुढील सुनावणीची तारीख, जुलै महिन्यामध्ये ठेवण्यात आली आहे. सध्या अवलंब होत असलेल्या देहदंडाच्या शिक्षेस, वेदना रहित किंवा कमी वेदनादायी पद्धतीचा अवलंब करून, शिक्षा देता येईल का ?याचा विचार ,केंद्र सरकारने गठीत करीत असलेल्या तज्ञांच्या समितीस करावयास लागणार आहे. सध्यपरिस्थितीत, केंद्र सरकार तर्फे एटर्नी जनरल आर. वेंकटरमणी यांनी, केंद्र सरकारने, वरील विषयाबाबतीत घेतलेल्या निर्णयाची तसेच सखोल विचार विनिमय करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्याच्या निर्णयाची माहिती सर्वोच्च न्यायालयाच्या पिठासमोर अवगत केली.