जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
आज घडलेल्या नीट परीक्षेच्या बाबतीत भाजपा महिला मोर्चाच्या वतीने निवेदन प्रभारी पोलिस अधीक्षक अरविंद बोडके यांना देण्यात आले.
सांगलीमध्ये रविवार दिनांक 7 मे रोजी NEET परीक्षा दरम्यान KWC कॉलेजच्या NEET परीक्षा सेंटरवर परीक्षेच्या दरम्यान परीक्षार्थी विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांची तपासणी करत त्यांनी परिधान केलेले कपडे उलटे घालायला लावून परीक्षेला बसवले. हा प्रकार चुकीचा, संतापजनक व निंदनीय आहे. बारावीनंतर NEET परीक्षेला बसणाऱ्या मुली या मोठ्या असतात. तपासणीच्या नावाखाली अशी चुकीची तपासणी करून अंतर्वस्त्र तपासून, कपडे उलटे घालायला लावणे हे चुकीचे व संताप आणणारे आहे. या सांगलीमध्ये घडलेल्या विद्यार्थिनींच्या व त्यांच्या पालकांच्या मध्ये व नागरिकांच्या मध्ये संतापाची लाट आहे. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा, नगरसेविका ॲड. स्वाती शिंदे व पदाधिकाऱ्यांनी ताबडतोब पोलिस अधीक्षक, सांगली यांची भेट घेऊन याची सखोल चौकशी होऊन दोषी अधिकाऱ्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी केली.
यावेळी भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी नगरसेविका उर्मिला बेलवलकर, नगरसेविका गीतांजली ढोपे-पाटील, माधुरी वसगडेकर, लीना सावर्डेकर, निकिता चव्हाण उपस्थित होते.