जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
मुंबईच्या आयआयटी अर्थात भारतीय प्रौद्योगिक संस्था मध्ये, पहिल्यांदाच दीक्षांत समारंभाच्या ऐवजी प्रारंभ समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. आयआयटी म्हणजे भारतीय प्रौद्योगिक संस्था हे, उद्योगतेच केंद्र बनायला हवं ,शिवाय विद्यार्थ्यांना रोजगार शोधणारे नव्हे तर, रोजगार निर्मितीचे केंद्र व्हायला हवे असे मत केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे. आजच्या मुंबईतील आयआयटी प्रारंभ समारंभ 2023 ला संबोधित करताना ते बोलत होते.
आयआयटी म्हणजे भारतीय प्रौद्योगिक संस्था हे शैक्षणिक संस्था न राहता, लोककल्याणाच्या प्रयोगशाळा बनायला हव्यात. आयआयटी मधून शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांनी, आगामी नवीन भारताच्या समाजाचं प्रतिनिधित्व करायला हवं, तसेच त्यातील मूलभूत तत्व म्हणजे समाजाची सेवा करणे हेच शिक्षणाचे उद्दिष्ट आहे, हे ग्रामीण भागातील मुलांना समजावयास हवे असे केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे .आज प्रथमच आयआयटी मुंबईच्या सिनेटने यंदाच्या वर्षीपासून, दीक्षांत समारंभ ऐवजी प्रारंभ समारंभ आयोजित करण्याचा निर्णय घेतला गेला असून, सुमारे जवळपास 2500 विद्यार्थी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.
आजच्या कार्यक्रमास होमी भाभा राष्ट्रीय संस्थेचे कुलपती डॉ.अनिल काकोडकर, आयआयटी मुंबईचे संचालक प्राध्यापक सुभासिस चौधरी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.