जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
भारतातील नवीन संसद भवनाचा आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ठीक दुपारी 12:00 वाजता उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न होणार असून, सर्व विरोधीपक्षी यांचा उद्घाटन समारंभ सोहळ्याच्या कार्यक्रमावर बहिष्कार कायम राहिला आहे. लोकसभेचे विद्यमान अध्यक्ष ओम बिर्ला हे कार्यक्रमास मुख्यत्वे उपस्थित राहणार आहेत. आजच्या नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभ सोहळ्यास, देशातील मान्यवर व्यक्ती, अभिनेते, पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. सकाळी ठीक 7:30 ते 8:00 वाजता वेदोक्त मंत्रोच्चारात हवन व पूजा, सकाळी ठीक 9:00 वाजता पंतप्रधान यांना तामिळनाडूतील शैव मठाकडून परंपरेनुसार राजदंड प्रदान करण्यात येईल. सकाळी ठीक 11:30 वाजता पाहुणे व मान्यवर व्यक्तींचे आगमन, दुपारी 12:00 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात , सकाळी ठीक 12 वाजून 10 मिनिटास, भारताचे महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व उपराष्ट्रपती जगदीश धनकड यांच्या संदेशाचे वाचन, दुपारी 12 वाजून 17 मिनिटास संसदभवना आधारित दोन लघुचित्रपतींचे प्रसारण ,दुपारी ठीक 01वाजून 05 मिनिटांनी 75 रुपयांच्या नाण्याचे लोकार्पण, दुपारी ठीक 01वाजून 10 मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण, शेवटी दुपारी ठीक 2:00 वाजता धन्यवादाच्या प्रस्तावाने सर्व कार्यक्रमाची सांगता होईल.
दरम्यान बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी देशाच्या सार्वभौम असलेल्या संसदीय प्रणालीमध्ये ,राष्ट्रपतीना फार मोठे स्थान असून, त्यांना समारंभास न बोलणे हे इतिहास बदलण्याचे काम असल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकारने आमच्याशी कोणतीही चर्चा न करता विश्वासात न घेता, सदरहू कार्यक्रम होत असून महामहीम राष्ट्रपतींना न बोलवणे व त्यांच्याच हस्ते उद्घाटन समारंभ न करणे हे अपेक्षित नव्हते असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे .एकंदरीतच भारताच्या नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभ सोहळ्यावर सर्व विरोधी पक्ष्यांचा बहिष्कार कायम असून, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी ठीक 12:00 वाजता, नवीन संसदीयभवनाचा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न होत आहे, या सर्व गोष्टींची नोंद इतिहासात होईल.