जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री मा.जयंत पाटील यांना ईडी मार्फत भाजपा सरकारकडून केल्या जाणाऱ्या बदनामीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहरजिल्ह्याच्या वतीने शहरजिल्हाध्यक्ष मा.संजयजी बजाज व युवक शहरजिल्हाध्यक्ष मा.राहुलदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ईडी व भाजपा विरोधात सांगली येथे निदर्शने व ठिय्या आंदोलन करण्यात आले.यावेळी पदाधिकारी यांनी ' सरकार साहेब से डरती है , ईडी को आगे करती है' आम्ही सदैव सोबत , व वातावरण फिरलं भाजपा घाबरलय अश्या घोषणा देत भाजप व ईडी च्या विरोधात तीव्र निदर्शने केली
राष्ट्रवादी चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब हे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून संपूर्ण राज्यात फिरून पक्ष वाढीचे चांगले काम करत अनेक सामान्य घरातील युवकांना संधी त्यांनी दिली आहे, ईडी चा वापर करून जयंत पाटील साहेब यांची प्रतिमा मलिन करण्याचा व त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न सरकार कडून होत आहे पण त्यातून काहीच साध्य होणार नाही , कारण जयंत पाटील साहेब हे स्वच्छ प्रतिमेचे नेते आहेत व आम्ही सर्वजण त्यांच्या सोबत आहोत, अश्या प्रतिक्रिया पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
यावेळी सागर घोडके, तानाजी गडदे ,उत्तम कांबळे,धनंजय पाटील ,अनिता पांगम वंदना चंदनशिवे , वैशाली कळके , छाया जाधव ,ज्योती अदाटे, समीर कुपवाडे ,बिरेंद्र थोरात , डॉ शुभम जाधव , उमर गवंडी , युवराज गायकवाड ,महालिंग हेगडे , विनायक हेगडे , अर्जुन कांबळे , रामभाऊ पाटील , धनपाल खोत , अभिजित कोळी , मदन पाटील ,प्रकाश सुर्यवंशी ,संगीता जाधव ,अमृता चोपडे ,सुरेखा सातपुते , संजय तोडकर ,रुपाली कारंडे , प्रियांका तुपलोंढे, फिरोज मुल्ला , डॉ सतीश नाईक , युसूफ जमादार ,संजय सरवदे ,रवींद्र कदम, मुन्ना शेख , सरफराज शेख , पिंटू माने , अरुण चव्हाण,कुमार वायदंडे , नंदकुमार घाटगे ,अक्षय शेंडगे ,मनोज हेगडे ,नितीन माने , सचिन लाड ,अमित चव्हाण ,दत्ता पाटील , राहुल यमगर , जुबेर मुजावर , गणेश तेली , समीर शेख , अजित जाधव ,विजय जाधव ,रुपेंद्र जावळे , आशिष पवार ,अमीन शेख ,इकबाल मुल्ला , पुष्पक चौगुले ,आदर्श कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.