जनप्रतिसाद न्यूज नेटवर्कः
(अनिल जोशी)
कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी, काँग्रेस पक्षाने दिलेल्या आदेशाप्रमाणे, सांगली काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील यांनी प्रचारात उतरून आघाडी घेतली आहे. कर्नाटक येथे सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचार रणधुमाळीत सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री पृथ्वीराज हेही उतरलेले आहेत. चिकोडी- सदलगा विधानसभा मदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आमदार गणेश हुकेरी यांच्या प्रचारार्थ त्यांनी आज ठिकठिकाणी बैठका घेतल्या.
या मतदारसंघातील अनेक गावात जाऊन श्री. पाटील यांनी मतदारांशी संवाद साधला. विकासासाठी काँग्रेसच्या उमेदवारांला निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.काँग्रेस पक्षाशिवाय कर्नाटक राज्याला पर्याय नाही. केंद्रातल्या मोदी सरकारने महागाई प्रचंड प्रमाणात वाढवलेली आहे. त्यांच्या सरकारमध्ये भ्रष्टाचार प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे त्यामुळे काँग्रेसलाच येथे निवडून द्यावे ते चांगला कारभार करून दाखवतील असा विश्वास ही श्री. पाटील यांनी मतदारांच्या समोर बोलताना व्यक्त केला.
ते म्हणाले, कर्नाटकात सर्वत्र काँग्रेससाठी निवडणुकीत अनुकूल वातावरण आहे. भाजप सरकारच्या कारभाराला इथले लोक कंटाळलेले दिसतात, त्यामुळे बहुमताने काँग्रेसच सत्तेवर येईल याबाबत कुठलीच शंका नाही. अनेक ठिकाणी लोकांनी श्री. पाटील यांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन स्वागत केले.
-----