जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
भारतीय केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे, राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी नुकतेच आदेश जारी केले असून, राज्यातील निवडणूक शाखांमधील कर्मचाऱ्यांना, निवडणुकी व्यतिरिक्त अन्य कोणतीच कामे देण्यात येऊ नयेत अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. सध्याच्या परिस्थितीत राज्यातील निवडणूक विभागांमध्ये कर्मचाऱ्यांना, निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त अन्य कोणतीच कामे देण्यात येऊ नयेत असे निर्देश आल्यामुळे, सर्वत्र राज्यातील लोकसभेच्या निवडणुकीबरोबर विधानसभेची निवडणूक होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
राज्यातील निवडणूक विभागातील सर्व कर्मचारी व अधिकारी वर्ग, सध्या लोकसभेच्या निवडणुकीच्या बरोबरच, विधानसभा निवडणुकीच्या होण्याच्या संकेताने, निवडणुकीच्या संबंधित कामात व्यग्र असून, त्यांच्याकडे इतर कोणतीही कामे सोपवली जात नाहीत असे चित्र पाहावयास मिळत आहे. 2024 साली होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीबरोबरच राज्यातील विधानसभा निवडणूक होण्याच्या संदर्भात, नुकत्याच राज्यातील निवडणूक शाखेतील सर्व अधिकारी कर्मचारी वर्गांना सूचना, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्याकडून आल्या असल्याचे समजते .केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना प्राप्त झालेल्या निर्देशानुसार, राज्यातील सर्व जिल्ह्यातील संबंधित विभागाचे अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग हे कामाला लागले आहेत.