जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
सांगलीत आज, भारतीय जनता पार्टीच्या सांगली शहर व जिल्हा सोशल मीडिया सेलची बैठक, निवडक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत, आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात, रविवार दिनांक ७ मे रोजी पार पडली. यावेळी सोशल मीडिया प्रदेश सहसंयोजक पियुष कश्यप, चंद्रभूषण जोशी तसेच पश्चिम महाराष्ट्र विभागीय संयोजक निखिल पंचभाई यांनी मार्गदर्शन केले.
आगामी महानगरपालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्या गोष्टी करणं आवश्यक आहे यावर चर्चा करण्यात आली. यावेळी सांगली शहर जिल्हा सरचिटणीस केदार खाडिलकर यांनी सोशल मीडिया कार्यकर्ता विस्तार अभियान राबविण्याची घोषणा केली.गुगल फॉर्मच्या माध्यमातून लवकरच नवीन सोशल मीडिया कार्यकर्त्यांची फळी उभी करण्यात येणार आहे. मोदी सरकार आणि महायुती सरकार यांचे निर्णय, योजना याबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिकाधिक माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. या बैठकीला सोशल मीडिया प्रदेश कार्यकारिणी सदस्य संकेत कुलकर्णी, युवा मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अजिंक्य हंबर, चेतन माडगूळकर, श्रीवल्लभ कुलकर्णी, कपिल पुजारी, चैतन्य भोकरे, शहर जिल्हा आयटी संयोजक शुभम कुलकर्णी आदी पदाधिकारी उपस्थित होते.