जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
सांगलीच्या संकेत महादेव सरगर यांने, गेल्या वर्षी इंग्लंड येथील झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत, वेटलिफ्टिंग मध्ये भारताला रौप्य पदक मिळवून दिले होते. याची महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन, क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च असणारा शिवछत्रपती पुरस्कार संकेत महादेव सरगर याला जाहीर करण्यात आला आहे. आष्टा येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचा संकेत महादेव सरगर हा विद्यार्थी असून, इंग्लंड येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टिंग मध्ये 55 किलो वजनी गटात त्याने ,रोेप्य पदकाला गवसणी घातली होती. महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातील असणारा सर्वोच्च पुरस्कार म्हणून ख्याती असलेला, शिवछत्रपती पुरस्कार देऊन, संकेत महादेव सरगर यास गौरवण्यात आले आहे.
आष्टा येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात आज आनंदोत्सव साजरा करण्यात आला असून ,हा आमच्या कॉलेजचा अभिमान आहे असे प्राचार्य डॉ. कुरळपकर यांनी सांगितले आहे. भविष्यातही संकेत महादेव सरगर हा ,ऑलम्पिक मध्ये भारताला पदके मिळवून देण्यात यशस्वी ठरेल असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. कुरळपकर यांनी सांगितले. संकेत महादेव सरगर याने व त्यांच्या आई-वडिलांनी, फार मोठ्या कष्टाने जीवनाच्या संघर्षावर मात करून, ह्या यशाला गवसणी घातली आहे. संकेत महादेव सरगर याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कासेगाव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शामराव पाटील, सचिव प्राचार्य आर. डी. सावंत, सहसचिव प्राचार्य राजेंद्र कुरळपकर यांनी शिवछत्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार विजेता संकेत महादेव सरगर याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .फार मोठ्या प्रतिकूल परिस्थिती त्याने कष्ट करून, इंग्लंडमधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टिंग विभागात, रोेप्य पदक मिळवल्याचा सर्व सांगलीकरांना सार्थ अभिमान आहे.