जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क:-
(रितेश तांदळे)
कानावरती केस असणं शुभ की अशुभ असा प्रश्न बरेच जणांना पडतो. आणि याच प्रश्नाचं उत्तर आज या पोस्ट मध्ये शोधण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. मंडळी काही लोकांना जन्मताच कानावर केस असतात तर काही ना वयाच्या एका विशिष्ट टप्प्या वर कानावर केस येतात. अशा वेळी आपल्याला प्रश्न पडतो की हे केस असणं शुभ की अशुभ हा एक अपशकुन तर नाही ना? असा ही प्रश्न साधारणतः माणसाला पडायला लागतात.
सामुद्रिक शास्त्रामध्ये अशा व्यक्ती कशा असतात? त्यांचा स्वभाव कसा असतो याबद्दल सविस्तर वर्णन केले गेले आहे. हे केस छोटे किंवा मोठे असोत या सर्वाबद्दल सामुद्रिक शास्त्र काय म्हणतात ते जाणून घेऊ या. सामुद्रिक शास्त्र असा मानतात की कानावर केस येणारा व्यक्ती भाग्यवान असतात, नशीबवान असतात.मग ते केस छोटे असो किंवा मोठे एकदा काम हाती घेतल्यानंतर ते काम कसे पूर्ण करायचे त्यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करायचा याचं सगळं कौशल्य अशा व्यक्तीकडे असते. थोडक्यात काय तर जे काम या व्यक्ती हातात घेता. त्या पूर्ण करतात. अशा व्यक्ती मध्ये चिकाटी हा गुण असतो.
मात्र त्याचबरोबर थोडासा कंजूस पणा देखील असतो. धन पैसा साठवून ठेवण्याकडे यांची वृत्ती असते. त्यांना त्यांच्या जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करणे सुद्धा नको वाटतं. पण या व्यक्तीचे भाग्य सुद्धा प्रभावी असते. मात्र जेव्हा कानावर आलेले केस तुम्ही काढून टाकता किंवा कापता तेव्हा तुम्हाला भाग्याची साथ मिळत नाही असा अनुभव सुद्धा पाहू शकता की या व्यक्तीचे जीवन आहे ते एका विशिष्ट वेळेपर्यंत चांगले चालू असते.मात्र एका विशिष्ट काळानंतर जेव्हा जेव्हा ते आपल्या कानांवरचे केस काढता किंवा काढण्याचा प्रयत्न करतात किंवा कायमचे काढून टाकता तेव्हा त्यांना वेगळे अनुभव यायला सुरुवात होते. असा सामुद्रिक शास्त्रामध्ये म्हटले. यावर उपाय म्हणजे सामुद्रिक शास्त्राने असं सांगितलं आहे की हे कानावरील केस आपण मूळासकट उपटून आहेत ते थोडेसे बाकी ठेवावे जेणे करून आपलं सौंदर्य ही खुलून दिसेल आणि आपल्याला त्याचा त्रास ही होणार नाही.
मात्र मुळापासून असे केस कधीही काढू नये. थोडक्यात काय तर कानांवरती केस असतील तर तुमचं सौंदर्य खराब होत आहे असा विचार तुम्ही करू नका. कारण की तुम्ही लकी आहात याचं ते लक्षण आहे आणि मंडळी हे लक्षात ठेवायला हवं की आपलं शरीर आपल्याला ईश्वराने दिलेला आहे.त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे काही गुण दोष असतील ते आपण स्वीकारायला हवेत. त्याचा द्वेष करता कामा नये, स्वतः वर प्रेम करायला शिकायला हवं. तरच जग आपल्यावर प्रेम करेल.