जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
सांगली जिल्ह्यासह आज ,सांगली शहर व मिरजेत पावसाने हजेरी लावली असून ,तापलेल्या वातावरणात पावसाचा शिडकावा झाल्याने नागरिकांना थोडा दिलासा मिळून, हवेत गारवा निर्माण झाला आहे. आज सकाळपासूनच जिल्ह्यात काही ठिकाणी ऊन- सावलीचा खेळ सुरू होता व उकाड्यात प्रचंड प्रमाणात वाढ झाली होती. मिरजेत मार्केटमध्ये जोरदार पाऊस झाला. सांगली जिल्ह्यातील विटा, खानापूर, भिवघाट, पलूस, दूधो्ंंडी,माडग्याळ भिलवडी ,वाळवा आदी ठिकाणी चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्याचे वृत्त आहे. अंकलखोप परिसरात विजेच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लागली असून, तुंग गावातही चांगल्या प्रमाणात पाऊस झाला आहे. पलूस शहरात आज सकाळपासूनच वातावरण ढगाळ होते. सायंकाळी 4:00च्या सुमारास सुरू झालेला पाऊस हा पलूस, अंकलखोप, आंधळी ,सावंतपूर अमणापुर सह सर्वत्र झाल्याचे वृत्त आहे.
सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी विजेच्या गडगडात झालेल्या पावसामुळे, वीजपुरवठा खंडित झाला होता. दूधोंडी गावात आज 3:00च्या सुमारास चालू झालेल्या पावसामुळे ,काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित जागा होता. शेर- दुधोंडी रेल्वे गेट परिसरात झालेल्या पावसाने, उसाचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. भिलवडी माळवाडी परिसरातही दमदार पावसाने हजेरी लावली आहे. आज सायंकाळी 6:00च्या सुमारास माडग्याळ परिसरात जोरदार विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला असून, सर्वत्र ठिकाणी पाण्यात साचले होते. आष्टा शहरातही आज पावसाने दमदार हजेरी लावली असून, काही ठिकाणी वादळी वाऱ्याच्या विजेच्या गडगडाच्या पावसामुळे, ऊस शेतीचे नुकसान झाले आहे. एकंदरीतच आजचा सांगली जिल्ह्यातील शहरातील झालेला पाऊस, हा एक वातावरणात सुखद गारवा निर्माण करून गेला.