जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(मिलिंद पाटील)
एज्युकेशन डेव्हलपमेंट कमिटी सरनोबतवाडी यांच्या विद्यमाने दहावी व बारावी यशस्वी विद्यार्थी तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे मा. सत्यराज घुले सहाय्यक पोलीस निरीक्षक गांधीनगर, हुमायून मुरसल सर अध्यक्ष सेंटर रेनेसा, ग्रामपंचायत सरपंच शुभांगी किरण आडसूळ, तसेच कमिटीचे अध्यक्ष असलम मिस्त्री व अमृत नगर सोसायटी चे चेअरमन निसार शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी कार्यक्रमांमध्ये महिलांची लक्षणीय संख्या होती.
या कार्यक्रमा वेळी युवा पत्रकार संघ तालुका करवीर अध्यक्षपदी अझरुद्दीन दस्तगीर मुल्ला यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
मा.सत्यराज घुले साहेब यांनी विद्यार्थ्यांसोबत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली. करिअरचे वेगवेगळे मार्ग सांगितले तसेच नव्या पिढीसाठी मोबाईल, इंटरनेट ,सोशल मीडिया यांचा उपयोग व दुरुपयोग समजावून सांगितला. विद्यार्थ्यांनी न्यूज पेपर, पुस्तके तसेच वाचनाचा छंद जोपासावा असे सांगितले .
हुमायून मुरसल सर यांनी विद्यार्थ्यांची संवाद साधला यावेळी त्यांनी सध्याचे शिक्षण पद्धती बद्दल तसेच विद्यार्थ्यांचा होणारा समभ्रम व विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त कायदा व घटनेचे ज्ञान घ्यावे व या क्षेत्रात करिअर करावे असे संबोधले. किरण आडसूळ यांनी आपले मत व्यक्त केले सरनोबत वाढीतील विद्यार्थ्यांचा विकास कसा होईल याकडेही लक्ष देऊ अशी ग्वाही यावेळी दिली. कार्यक्रमाचे आभार निसार शेख यांनी मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलीम मनियार सर यांनी केले व या पूर्ण कार्यक्रमाचे संयोजन बाझील शेख ,यासीन मुजावर,साद शिलेदार तसेच एज्युकेशन सोसायटी चे संचालक यांनी केले होते.