महाराष्ट्र राज्यातील 11 जिल्ह्यांना, पुढील 5 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा.--भारतीय हवामान विभाग.

0

 

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

(अनिल जोशी) 

भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांना पुढील 5 दिवसासाठी, उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. सर्वसाधारणपणे सकाळी 10:00 ते दुपारी 3:00 या कालावधीत नागरिकांनी, कामा व्यतिरिक्त बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. सध्या परिस्थिती झारखंड, जमशेदपूर मध्ये देखील तापमान 44 अंशाच्या वर गेले आहे.  महाराष्ट्र राज्यात विदर्भात देखील सध्या उष्णतेचा पारा वाढत चालला आहे. भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या निवेदनात, महाराष्ट्रातील ठराविक 11 जिल्ह्यांना, पुढील 5 दिवस उष्णतेचा प्रभाव राहील असे म्हटले आहे. दरम्यान राज्यात पुढील 3-4 दिवस, मराठवाडा- मध्य महाराष्ट्र येथे मान्सून पूर्व पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. विदर्भात देखील 2 दिवस उष्णतेचा लाट टिकून राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सध्याच्या परिस्थितीत कोकणातून मान्सून पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल नसून, 22 जून नंतर या परिस्थितीमध्ये सुधारणा होईल असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. एकंदरीतच महाराष्ट्र राज्यातील बळीराजाच्या चिंतेत पाऊस लांबल्याने भर पडली आहे.



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top