जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी )
भारतीय कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख भारतीय कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख बृजभूषण शरण सिंग यांच्या विरुद्ध लैंगिक छळांच्या आरोपांचा तपास 15 जून पर्यंत पूर्ण करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री अनुराग सिंह ठाकुर यांनी दिले. आज आंदोलन कुस्तीपटुंनी, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांच्या नेतृत्वाखाली ,नवी दिल्लीतील निवासस्थानी केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री अनूराग सिंह ठाकुर यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी वरील आश्वासन दिले आहे .त्याबरोबरच भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक देखील 30 जून 2023 घेण्यात येण्याचे आश्वासन केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री अनुराग सिंह ठाकुर यांनी दिले आहे. दरम्यान 28 मे 2023 रोजी संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी, दिल्लीत झालेल्या आंदोलन प्रसंगातील सर्व कुस्तीपटूंवर दाखल झालेले सर्व गुन्हे, मागे घेण्यात येतील असे त्यांनी सांगितले. आज केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री अनुराग सिंह ठाकुर यांनी, कुस्तीपटूंना सर्व समस्यांवर चर्चा करण्यासाठी आमंत्रित केले होते. त्याचबरोबर सरकार कुस्तीपटूंशी, त्यांच्या समस्यावर चर्चा करण्यासाठी सदैव तयार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देखील आंदोलनात सहभागी असलेल्या कुस्तीपटूंनी भेट घेतली होती .गेले काही दिवस कुस्तीपटूं, भारतीय कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख बृजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात निदर्शने करून ,अटकेची मागणी करत आहेत. सद्य परिस्थितीत सरकार देखील हा प्रश्न सोडवण्याच्या मार्गाला लागले आहे.