जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
सांगलीमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस 26 जून हा, "सामाजिक न्याय दिन" म्हणून साजरा करण्यात येणार असून, हा संपूर्ण कार्यक्रम सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सांगली कार्यालय, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृह ,जुना बुधगाव रोड येथे संपन्न होणार आहे. त्याबरोबरच सदर कार्यक्रम हा सोमवारी 26 जून रोजी सकाळी ठीक 11:00 वाजता सुरू होणार असल्याची माहिती, समाज कल्याण सांगली कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी दिली आहे. या कार्यक्रमाच्या वेळी, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर, विविध पुरस्कार असलेल्या प्राप्त व्यक्ती, जेष्ठ कथाकथनकार व प्रसिद्ध लेखक जयवंत आवटे यांचे व्याख्यान होणार असून ,सदरहू कार्यक्रमास सांगली जिल्ह्यातील सर्व पुरस्कार प्राप्त व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व सांगली शहरातील सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन सहाय्यक आयुक्त श्री जयंत चाचरकर समाज कल्याण सांगली कार्यालय यांनी केले आहे.