जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
पंढरपूर मध्ये आषाढी एकादशी निमित्त,येत्या 28 जून 2023 रोजी बऱ्याच संतांच्या पालख्यांचे आगमन होणार असून, 29 जून 2023 रोजी आषाढी एकादशीवेळी, अलंकापुरीत अलौकिक मुख्य सोहळा, साधू संतांच्या पालख्यांबरोबर, वारकऱ्यांच्या सोबत रंगणार आहे.
पंढरपूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने वारकऱ्यांसाठी,विविध सेवा सुविधांची योजनांची व्यवस्था करण्यात आली आहे. पंढरपूर मध्ये महिला वारकरी भाविकांसाठी जवळपास 3000 स्नानगृह उभारण्यात आले असून, 8500 हजार शौचालयाची उभारणी करण्यात आली आहे. पंढरपूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने,आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर, जवळपास 21 आपत्ती व्यवस्थापन केंद्र तयार करण्यात आली असून ,पाणीपुरवठ्यासाठी 49 टँकर सुसज्ज ठेवण्यात आले आहेत ,शिवाय त्यामध्ये पाणी कायम भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पंढरपूर मध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीने, औषधोपचार केंद्रे, गॅस वितरण व्यवस्था ,आपत्ती निवारण केंद्रे, वारकरी सहाय्यकेंद्रे, आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांसह आरोग्य दवाखाने आदी सर्व व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत.पंढरपूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने चोख सुरक्षा व बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.