जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
आज पंढरपूर मध्ये आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांसाठी झालेल्या तयारीचा पूर्ण आढावा, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी घेतला. काही बाबतीत कामात त्रुटी आढळल्याने, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी, सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांसह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना फैलावर घेऊन, सक्त सूचना केल्या आहेत .दरम्यान कोणत्याही परिस्थितीत, संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालख्या सहित इतर पालख्यांच्या बरोबर सर्व भक्त भाविक वारकरी, पंढरपुरात दाखल होण्याआधी, युद्धपातळीवर काम पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दिले आहेत.
पंढरपुरातील आषाढी एकादशीच्या निमित्ताने ,देशातून व राज्यातून येणाऱ्या लाखो भक्त भाविक वारकऱ्यांसाठी, रस्ते- पाणी -स्वच्छता- आरोग्य विषयक सोयी व इतर सुविधांच्या मध्ये, कोणताही हलगर्जीपणा चालणार नसून, काम चुकार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दिला आहे. पंढरपूर रस्त्याकडे येणारे सर्व खड्डे ताबडतोब कोणत्याही परिस्थितीत मुजवून, एका समान पातळीवर रस्ता तयार झाला पाहिजे. याबाबतीत पायी चालत येणाऱ्या भक्त भाविक वारकऱ्यांना ,कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दिले आहेत. दरम्यान पंढरपूर विकास कामांसाठी यापुढे जर कोणताही निधी लागला, तर विशेष निधीच्या बाबी अंतर्गत, तत्काळ सर्व निधीची व्यवस्था करत आहे, कामे त्वरित करा, वेळेत पूर्ण करा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दिले .आज अलंकापुरी पंढरपुरात आषाढी एकादशीच्या वारीनिमित्त अलौकिक होणाऱ्या सोहळ्याच्यावेळी, सर्व सोयी सुविधांच्या तयारीचा आढावा आणि पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे पंढरपुरात दाखल झाले होते .स्वतः मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी रांगेत जाऊन, भक्त भाविक वारकऱ्यांची संवाद साधत, सर्व काही परिस्थितीचा आढावा घेतला. मंदिर परिसर व भक्तांसाठी निवास योजनेसाठी उभारणी करण्यात आलेल्या 65 एकर जागेच्या परिसराची पाहणी करून, योग्य त्या सोयीसुविधा साठी सूचना करून ,मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे परत मुंबईसाठी रवाना झाले.