जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा.आ जयंत पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार व शहरजिल्हाध्यक्ष मा.संजयजी बजाज व युवक शहरजिल्हाध्यक्ष मा.राहुलदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या २४ व्या वर्धापन दिनानिम्मित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहरजिल्ह्याच्या वतीने झेडावंदन सकाळी ठीक १० वाजून १० मिनिटाने करण्यात आले. यावेळी झेंडावंदन राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले ,यावेळी ते म्हणाले की आपला पक्ष हा २५ व्या रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे, येत्या वर्षात आपण अजून ताकतीने काम करू , राष्ट्रवादी पक्षाचे , मा.खा शरदचंद्रजी पवार साहेबांचे व प्रदेशाध्यक्ष मा. आ जयंत पाटील साहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोहचवूया असे ते म्हणाले व सर्वांना वर्धापन दिनानिम्मित शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापनदिना निम्मित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या वतीने आयोजित करण्यात आले होते यावेळी मोफत आरोग्य तपासणी करून मोफत औषधांचे वाटप करण्यात आले यासाठी सेवासदन हॉस्पिटलचे विशेष सहकार्य मिळाले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पुरोगामी विचारावर चालणारा पक्ष आहे.महाराष्ट्राचे पुरोगामित्व नेहमीच जपण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तसेच पक्षाच्या नेत्यांनी ,पक्षाच्या प्रत्येक घटकाने केले आहे.त्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग , राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल यांच्यामार्फत व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहरजिल्ह्याच्या वतीने वर्धापनदिनामित्त छत्रपती शिवाजी महाराज,आण्णाभाऊ साठे तसेच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
त्याचबरोबर सांगली क्रिकेट असोसिएशन तसेच पोलाईट क्रिकेट क्लबचे अध्यक्ष आणि सांगली शहर जिल्हाध्यक्ष मा.संजयजी बजाज साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांसाठी क्रिकेट स्पर्धाही भरविण्यात आल्या.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली जिल्हा (ग्रामीण)जिल्हाध्यक्ष अविनाश (काका) पाटील युवक शहरजिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार , विधानसभा क्षेत्र अध्यक्ष पद्माकर जगदाळे , सांगली शहर अध्यक्ष सागर घोडके ,कुपवाड शहर अध्यक्ष तानाजी गडदे ,धनपाल खोत , स्वाती पारधी ,असिफ बावा, समीर कुपवाडे ,उत्तम कांबळे, आयुब बारगिर, सचिन जगदाळे,अनिता पांगम , वंदना चंदनशिवे , वैशाली कळके , छाया जाधव , डॉ शुभम जाधव , महालिंग हेगडे, युवराज गायकवाड , गॅब्रियल तिवडे , अर्जुन कांबळे, संजय औंधकर , रामभाऊ पाटील, अकबर शेख , उषा गायकवाड , संगीता जाधव ,छाया पांढरे, स्वाती शिरूर , सुनीता जगधने , प्रकाश सुर्यवंशी , कुमार वायदंडे , मनोज हेगडे ,नंदकुमार घाटगे , विराज कोकणे , प्रसाद मदभाविकर , सुभाष चिकोडीकर ,अरुण चव्हाण , वाजीद खतीब , महावीर खोत ,परवेज मुलाणी , राहुल यमगर ,मनोज हेगडे, अझहर सय्यद ,जुबेर मुजावर ,दत्ता पाटील , युवराज नाईकवाडे , समीर शेख ,इर्शाद पखाली, रुपेंद्र जावळे , सचीन सगरे, पुष्पक चौगुले , सतीश इंगोले, रोहन भंडारे , विक्रम शिंदे,आदर्श कांबळे आदी उपस्थित होते.