जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा.आ जयंत पाटील राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या प्रदेशाध्यक्षा विद्याताई चव्हाण पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा कविता म्हेत्रे यांच्या सूचनेनुसार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे शहरजिल्हाध्यक्ष मा संजयजी बजाज व युवक शहरजिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज राष्ट्रवादी महिला काँग्रेस सांगली शहरजिल्ह्याच्या वतीने आतंरराष्ट्रीय महिला कुस्ती पटू यांच्यावर झालेल्या अत्याचार व अन्यायाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.ज्या कुस्ती पटूंनी भारतासाठी मेडल जिंकले व देशाचे नाव वेगळ्या उंचीवर नेले, अश्या कुस्ती पटूंनी गेली तीन महिने झाले त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाले म्हणून उपोषण, आंदोलन केले . यांनी ज्यांच्यावर आरोप केले ते ब्रिजभूषण सिंग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत नवीन भवनाचे उद्घाटन करत होते , लैंगिक अत्याचारचे आरोप असताना सुद्धा पंतप्रधान यांच्या सोबत ते दिसतात ,यातून पंतप्रधान आणि ब्रिजभूषण यांना नेमका काय संदेश द्यायचा आहे ?याउलट 3 महिने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पकडून पोलीस ठाण्यात नेले.सदर निंदनीय घटनेचा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने निषेध करत आहोत व या महिला खेळाडूंसमवेत आम्ही राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या सर्व पदाधिकारी ठाम पणे उभ्या आहोत अश्या भावना महिला पदाधिकारी यांनी कँडल लावून निषेध व्यक्त केला व महिला खेळाडूच्या बाबतीत सदभावना व्यक्त केली.
यावेळी राष्ट्रवादी महिला प्रदेशच्या सचिव ज्योती अदाटे म्हणाल्या की आपल्या देशातील कुस्तीगीर महिला ज्यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठविला आहे , त्यांच्यावर अन्याय करणारा भाजप चा खासदार ब्रिजभूषण सिह याच्या बाबत भाजप ने पक्ष म्हणून कोणतीही कारवाई केली गेली नाही भाजपच्या काळात महिलांवर अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत याचा आम्ही आज निषेध करत आहोत.तसेच सांगली विधानसभा क्षेत्र महिला अध्यक्षा छाया जाधव म्हणाल्या की कुस्तीगीर महिलांवर अत्याचार होत असून भाजप सरकार न्याय देत नाही आम्ही याचा जाहीर निषेध करत आहोत.
यावेळी सांगली शहर अध्यक्षा अनिता पांगम , मिरज शहराध्यक्षा वंदना चंदनशिवे ,कुपवाड शहराध्यक्षा वैशाली कळके , महिला प्रदेश सचिव ज्योती अदाटे, विधानसभा क्षेत्रअध्यक्षा छाया जाधव ,उषा गायकवाड , छाया पांढरे, संगीता जाधव , प्रियांका तुपलोंढे , शाहिदा हकीम , छाया भिसे आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.