सांगली पोलीस खात्याला अखेर यश, नालसाब मुल्ला खून प्रकरणात संशयित एका अल्पवयीन आरोपीसह चौघा आरोपींना अटक . --

0


जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

(अनिल जोशी)

सांगलीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानसभा क्षेत्र उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते नालसाब मुल्ला यांच्या खून प्रकरणात, संशयित अल्पवयीन आरोपीसह चौघा आरोपींना अटक करण्यात, सांगली पोलीस खात्याला यश आले आहे. सांगलीतील 2019 मध्ये महेश नाईक खून प्रकरणात मोका अंतर्गत जेलमध्ये असलेल्या आरोपी सचिन डोंगरे याला, जामीन होत नसल्याच्या कारणास्तव, सामाजिक कार्यकर्ते नालसाब मुल्ला यांचा खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे .सदरहू नालसाब मुल्ला खून प्रकरणी 24 तासाच्या आत, संशयित एका अल्पवयीन आरोपीसह चौघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. शनिवारी रात्री 8:00 वाजण्याच्या सुमारास, सदरहू संशयित एका अल्पवयीन आरोपी सह चौघे आरोपीं ,सामाजिक कार्यकर्ते नालसाब मुल्ला यांच्यावर गोळीबार करत, कोयत्याने हल्ला करत, खून करून पसार झाले होते. 

सांगली पोलीस खात्याने ,सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक बसवराज तेली, उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, 24 तासाच्या आत संशयित एका अल्पवयीन आरोपीसह चौघा आरोपींना अटक करून, गजाआड केले आहे, शिवाय या चौघांनीही सामाजिक कार्यकर्ते नालसाब मुल्ला यांच्या खुनाची कबुली दिली आहे .सांगली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानसभा क्षेत्र उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते नालसाब मुल्ला हे आपल्या प्रभागात, गरीब लोकांना मोफत जेवण, विधवा महिलांना पेन्शन, रमजान- दिवाळी सणानिमित्त गरीब लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप आदी कार्य करत होते. सामाजिक कार्यकर्ते नालसाब मुल्ला यांच्या निर्घूण खुनाने , संपूर्ण सांगली शहरात खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top