जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
कोल्हापुरात आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा पुरोगामी वारसा टिकवण्यासाठी, शिव -शाहू सद्भावना फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी कोल्हापुरात हिंदू- मुस्लिम समाजात तेढ वाढून दंगल माजवण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे कोल्हापूर शहराच्या प्रतिमेस गालबोट लागले होते. कोल्हापूर शहर हे राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांचा जिल्हा म्हणून ओळखला जात असल्याने, यापुढे अशा अप्रिय घटना घडू नयेत म्हणून, शाहू प्रेमी नागरिक एकत्र येऊन, शिव -शाहू सद्भावना फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापुरात आज कोल्हापूर शहरवासीयांची ऐक्याची ताकद दाखवण्यासाठी, पुरोगामी विचारांचा वारसा टिकवण्यासाठी, श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या अधिपत्याखाली, शिव शाहू सद्भावना फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापुरातील सामाजिक ऐक्य कायम राहावे, पुरोगामी विचारांचा वारसा टिकवण्यासाठी, शिव -शाहू सद्भावना फेरी काढण्याचा निश्चय, राजर्षी शाहू सलोखा मंच कडून करण्यात आला असून, यासाठी 18 पगड जातीच्या समाजातील घटकांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त निघणाऱ्या तसेच हिंदू मुस्लिम समाजातील एकोपा कायम राहण्याच्या उद्देशाने निघणाऱ्या शिव- शाहू सद्भावना फेरीत, मोठ्या संख्येने बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे. कोल्हापुरातील नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला 4:00 वाजता अभिवादन करून सुरुवात होणार आहे. कोल्हापुरातील पूरोगामी विचारांचा वारसा सांगणारी शिव -शाहू सद्भावना फेरी ही ,सी.पी.आर.रुग्णालय मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात येणार असून, तेथे राष्ट्रगीत होऊन फेरीचा समारोप होईल असे आयोजकांतर्फे कळविण्यात आले आहे.