एचआयव्ही संसर्गितांवर वेळेत उपचार होण्यासाठी संशयित भागातील तपासण्या वाढवा.-जिल्हाधिकारी राहुल रेखावार.---

0


◆ जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबवा.

◆ उपकेंद्रांना डीपीसीतून रेफ्रिजरेटर; प्रस्ताव सादर करा.

◆ एचआयव्ही रुग्णांना वैद्यकीय सोयी सुविधा उपलब्ध करुन द्या.

      जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

          (अन्सार मुल्ला) 

एचआयव्ही संसर्गितांवर वेळेत उपचार होण्यासाठी जिल्ह्यातील संशयित भागातील तपासण्या वाढवा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या.

 जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली शाहूजी सभागृहात घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उत्तम मदने, सीपीआरच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर तसेच समिती सदस्य उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, जिल्ह्यात एचआयव्हीच्या तपासण्या वाढवून संसर्गितांना आवश्यक त्या वैद्यकीय सोयी सुविधा उपलब्ध करुन द्या. जिल्हा वार्षिक योजनेतून उपकेंद्रांसाठी आवश्यक असणारे रेफ्रिजरेटर देण्यात येतील, यासाठीचा प्रस्ताव तात्काळ सादर करा, असे सांगून क्षयरोग संशयितांची एचआयव्ही तपासणी करुन घ्या. एड्स प्रतिबंधासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबवा. प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवा. ई श्रम कार्डची नोंदणी करा, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी दिल्या. यावेळी जिल्ह्यातील एड्स संसर्गित रुग्ण, संसर्गित बालके, प्रभावी उपाययोजना आदी विविध बाबींचा आढावा त्यांनी घेतला.दीपा शिपूरकर यांनी सादरीकरणातून माहिती दिली.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top