जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
अलंकापुरी समजल्या जाणाऱ्या पंढरपुरात आज , दिंड्या दाखल होत आहेत. विठ्ठल नामघोषाने अलंकापुरी असलेली पंढरपुरनगरी दुमदुमून व भावभक्तीच्या वातावरणात न्हाऊन निघाली आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याची पादुका जवळ आरती व तिसरे उभे रिंगण पार पडले. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज पंढरपूर मुक्कामी असणार आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वाखरी येथे पादुकांची आरती झाल्यावर, दुपारी तिसरे उभे रिंगण पार पडणार असून, संत तुकाराम महाराज यांची पालखी आज पंढरपूर मुक्कामी असणार आहे.
आषाढी एकादशी निमित्त अलंकापुरी समजल्या जाणाऱ्या पंढरपुरात आज वारकरी भक्त- भाविकांचा मेळा सजला असून, जिकडे पहावे तिकडे विठ्ठल विठ्ठल नाम घोषाने अलंकापुरी न्हाऊन निघाली आहे. पंढरपूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व वारकरी भक्त भाविकांच्या सोयीसाठी चोख व्यवस्था करण्यात आली असून, उद्या अलंकापुरी समजल्या जाणाऱ्या पंढरपुरात जवळपास 18 लाख वारकरी भक्त भाविक असणार आहेत.