उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश दिल्ली, जम्मू, काश्मीर ,पंजाबसह उत्तरेकडील राज्यांमध्ये, पावसाचा कहर, 15 जणांचा मृत्यू.--

0


जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

(अनिल जोशी)

उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश, दिल्ली ,जम्मू-काश्मीर , पंजाब सह उत्तरेकडील राज्यात, पावसाचा कहर झाला असून ,वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडल्याने, रविवारी जनजीवन अस्ताव्यस्त झाले आहे. उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश,दिल्ली, जम्मू काश्मीर, पंजाब मध्ये काही ठिकाणी भूस्खलनाच्या घटना, दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या असून,अनेक नागरिकांना महापुराच्या आपत्तीग्रस्त स्थितीस तोंड द्यावे लागत आहे.

 उत्तर भारतातील प्रदेशात मुसळधार पावसामुळे नद्यांना महापूर आला असून,नद्यांनी रौद्ररूप धारण केले आहे. हिमाचल प्रदेशामध्ये अधिकृत वृत्तानुसार मुसळधार पावसामुळे, बऱ्याच घटना घडल्या असून ,जवळपास 13 ठिकाणी पूरग्रस्तस स्थिती नागरिकांना तोंड द्यावे लागत असून, जवळपास 600 ते 700 रस्त्यावर पाणी आल्यामुळे, रस्ते बंद करण्यात आल्याची माहिती प्रशासनामार्फत जाहीर करण्यात आली आहे. बियास नदीला मोठा पूर आल्यामुळे रविवारी नदीच्या आसपासचा भाग व पंचवक्त्र मंदिराचा भाग पाण्याने वेढला आहे. उत्तराखंड मधील बद्रीनाथ केदार, ऋषिकेश राष्ट्रीय महामार्गावर भूस्खलनाची घटना घडली असून, भूस्खलनामध्ये किमान तीन भाविकांचा मृत्यू झाला असल्याचे समजते. उत्तर भारतातील प्रदेशात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा कहर झाल्यामुळे, रेल्वे वाहतुकीसह सर्वच रस्ते वाहतुकीवर परिणाम झाल्याचे चित्र दिसत आहे. उत्तर भारत रेल्वे प्रशासनाच्या वतीने रविवारी बऱ्याच रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून,काही रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. सद्यस्थिती लक्षात घेता जम्मू-काश्मीर लडाख हिमाचल प्रदेशातील अनेक शहरांना रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. 

भारताची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये गेल्या 24 तासात 153 मिनी इतक्या पावसाची नोंद झाली असून, 1982 नंतर हा पाऊस विक्रमी समजला जातो. उत्तर भारतातील पंजाब,हरियाणा राज्यात राज्य सरकारने स्थानिक प्रशासनांना अलर्ट केल्या असून, पूर नियंत्रण कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. पंजाब व हरियाणा व उत्तर प्रदेश मधील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट तर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट भारतीय हवामान विभागातर्फे जारी करण्यात आलेला आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top