जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
रायगड जिल्ह्यातील खालापूरातील इर्शाळवाडी गावावर काल भीषण दुर्घटनेचा काळाने घाला घातला असून, झालेल्या दुर्घटनेत 16 मृत्युमुखी व 100 बेपत्ता आहेत. रायगड जिल्ह्यातील खालापूरतील इर्शाळवाडी गावावर रात्री 10:30 ते 11:00च्या दरम्यान दरड कोसळली गेली. दरड कोसळून आकस्मित झालेल्या घटनेची माहिती, जिल्हा प्रशासनास 11:30 वाजता प्राप्त झाली. त्यानुसार राज्य नियंत्रण कक्षाला रात्री 12:00 वाजता माहिती मिळाली.पहाटे जवळपास 4:00च्या सुमाराला एनडीआरएफची पथके घटनास्थळी रवाना झाली असून, राज्याचे मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे, आदिती तटकरे आदी महोदयांनी घटनास्थळी धाव घेऊन, बचाव व मदत कार्याचा आढावा घेतला आहे. व जिल्हा प्रशासनास योग्य त्या सूचना दिल्या आहेत.
पहाटे 5:00 ते 6:00 च्या सुमारास, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे घटनास्थळी दाखल झाले होते व त्यांनी घटनास्थळाचा, बचाव व मदत कार्याचा आढावा घेऊन, संबंधित जिल्हा प्रशासनाला तत्काल आपत्कालीन सूचनांचा आदेश दिला आहे.दरम्यान सकाळी 7:00च्या सुमारास डोंगराच्या पायथ्याशी रुग्णवाहिका पोहोचल्या. आज सायंकाळी 6:00 वाजता जिल्हा प्रशासनाने बचाव व मदत कार्याचा आढावा घेतला असून, रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी गावात अंदाजे 40 कुटुंब वास्तव्यास असल्याचे समजते, शिवाय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी गावाचे लवकरच पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले आहे. गेले 4-5 दिवस रायगड जिल्ह्यात चालू असलेल्या संततधार पावसाच्या धुमाकूळामुळे व इर्शाळवाडी गावावर कोसळलेल्या दरडीमुळे ,जिल्ह्यात हाकाराचे वातावरण निर्माण झाले आहे.
रायगड जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर बचाव व मदत कार्याचे कार्य चालू केले आहे. रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी गाव हे अतिदुर्गम भागात असून, वाहने पोहोचण्यास देखील अतिशय कठीण आहे. सद्यस्थितीत पावसाचा जोर कायम असल्याने ,बचाव कार्यात व मदतकार्यात अडथळे येत आहेत. रायगड जिल्हा प्रशासनाने तात्पुरता आपत्कालीन पक कक्ष निर्माण केला असून,बहुतांशी ग्रामस्थांची ओळख पटली आहे.इर्शाळवाडी गावात 40 घरे असून,जवळपास 200 पेक्षा जास्त ग्रामस्थांची वस्ती आहे. रायगड जिल्हा प्रशासनाच्या मदतीला,
दुर्गम ठिकाणी असलेल्या इर्शाळवाडी गावात स्थानिक नागरिक,एनडीआरएफची पथके ,टीडीआरएफ ची पथके कार्य करत असून ,सध्यस्थीतीस मदत व बचाव कार्यावर जोर देण्यात आला आहे .दरम्यान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी घटनास्थळांचा आढावा घेऊन, दुर्घटनाग्रस्त झालेल्या इर्शाळवाडी गावातील ग्रामस्थांचे तात्पुरते पुनर्वसन करून ,नंतर कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले आहे.