जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
विश्वाच्या अवकाश क्षेत्रात भारताने आज श्रीहरीकोटा येथून, चंद्राकडे आपले चांद्रयान-3 हे 40 दिवसाच्या मोहिमेवर पाठवले आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रो ने आज श्रीहरीकोटा येथील असलेल्या सतीश धवन अवकाश केंद्रातून, दुपारी 02 वाजून 35 मिनिटांनी एल व्ही एम -3 या प्रक्षेपकाद्वारे ,चांद्रयान -3 हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यासाठी रवाना केले. विश्वाच्या अवकाश क्षेत्रातील हा एक, चांद्रयान-3, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवणारा भारत हा पहिलाच देश असून,ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर, चंद्रावर चंद्रयान उतरवणारा भारत हा ,अमेरिका, रशिया व चीन या देशानंतरचा चौथा देश असेल. भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या सतीश धवन अवकाश केंद्रातून दुपारी 02 वाजून 35 चंद्राकडे झेपवलेल्या चंद्रयानाने, प्रक्षेपणानंतर 16 मिनिटातच ,पृथ्वीच्या जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिट मध्ये स्थिरावून, जवळपास 22 दिवस पृथ्वीच्या कक्षेत फिरून, पुढील 6 दिवसाच्या प्रवासासाठी चांद्रयान-3, चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल .जवळपास 13 दिवस चंद्राच्या कक्षेत चांद्रयान-3ने परिभ्रमण केल्यानंतर, चंद्रापासून 100 किलोमीटरच्या कक्षेत आल्यानंतर, प्रोपल्जन मॉडेल पासून लेंडर वेगळा होऊन ,चंद्राच्या दक्षिण ध्रुवा जवळ उतरवणारा भारत हा जगातील पहिलाच देश असेल. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अंधार असून, तेथे प्रकाश नसल्यामुळे जवळपास 200 अंश उणे सेल्सिअस पर्यंत तापमान असते. यापूर्वीच्या चांद्रयान-1 या सफलमोहीमेतून, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर फक्त पाणी असल्याचे स्पष्ट झाले आहे .यापूर्वीच्या अमेरिका, रशिया, चीन या देशानी पाठवलेली चांद्रयाने चंद्राच्या विषुववृत्ताच्या भागात उतरली होती. आजच्या भारतीय अवकाश संस्थेच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून चंद्राकडे पाठवण्यात आलेल्या चांद्रयान -3 चे विक्रम लॅन्डर , प्रग्यान बग्गी , प्रॉपल्जन मॉड्युल असे तीन भाग आहेत. यातील महत्त्वाचा भाग म्हणजे चांद्रयान-3 चे विक्रम लँडर व प्रग्यान बग्गी हे दोन भाग प्रत्यक्ष चंद्रभूमीवर उतरून प्रयोग करून ,तिसरा भाग असलेले प्रॉपल्जन मॉड्युल चंद्राच्या कक्षेत राहून, पृथ्वीच्या उत्सर्जनाचा अभ्यास करेल.
भारताच्या अवकाश प्रवासातील एक नवा अध्याय चांद्रयान-3ने लिहिला असून, भारताचे स्वप्न व महत्त्व आकांक्षाची ही मोठी भरारी असून, या महत्वपूर्ण कामगिरी व शास्त्रज्ञांच्या अथक समर्पणास, त्यांच्या भावना व प्रतिभेस माझा सलाम असे उद्गार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले आहेत. भारताचे चांद्रयान-3 चे चंद्राच्या भूमीवर प्रत्यक्ष 23 ऑगस्ट संध्याकाळी 05 वाजून 47 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग होईल. त्यानंतर भारताची चांद्रयान-3 ची चंद्राकडे झेपावलेली विश्वातील अवकाश क्षेत्रातील सफल प्रक्षेपणाची चंद्रावरील चांद्रयान-3 मोहिम यशस्वी होईल .या सर्व मोहिमेची विश्वाच्या अवकाश क्षेत्राच्या मोहिमेच्या इतिहासात नोंद होईल.