जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्याच्या परिवहन विभागातर्फे ,विमानातील प्रवाशांप्रमाणे, खाजगी बस चालक कंपन्यांनी आता ,प्रवाशांना, प्रवास सुरू होण्यापूर्वी खबरदारीच्या आवश्यक त्या सर्व सूचना देण्याचे आदेश राज्याच्या परिवहन विभागातर्फे जारी करण्यात आलेले आहेत ,अशी माहिती राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमानवार यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना याबद्दल योग्य त्या सूचना देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे. विमानातील प्रवाशांना ज्याप्रमाणे आपदग्रस्त दुर्घटनेवेळी ज्या सूचना देण्यात येतात, त्याप्रमाणे खाजगी बस चालक कंपन्यांनी आता, प्रवाशांना, प्रवास सुरू होण्यापूर्वी, खबरदारीच्या योग्य त्या तपशीलवार सूचना दिल्या जाव्यात, शिवाय रात्रीच्या वेळी झोपण्याची व्यवस्था असलेल्या बसमध्ये, प्रवाशांसाठी, आणीबाणीच्या प्रसंगी सुरक्षात्मक कोणते उपाय रात्रीच्या वेळी करावेत? याच्या स्पष्ट सूचना प्रवाशांना प्रवासाला निघण्यापूर्वी देण्यात याव्यात. नुकत्याच घडलेल्या एका भीषण झालेल्या समृद्धी महामार्गाच्या अपघातानंतर ,भविष्यात यापुढे कोणत्याही आपदग्रस्त दुर्घटना घडू नये याची काळजी घेण्यासाठी व उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने परिवहन विभागातर्फे योग्य ते निर्देश व सूचना जारी केलेल्या आहेत, अशी माहिती राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमानवार यांनी दिली.