जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
केंद्र सरकारने नुकतेच महाराष्ट्रासह कर्नाटक,आंध्र प्रदेश राज्यांना, टोमॅटो खरेदीचे आदेश दिले आहेत. केंद्र सरकारने सद्य परिस्थितीत टोमॅटोच्या वाढत्या दराला आळा घालण्यासाठी हे पाऊल उचललेले आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने ,राष्ट्रीय सहकारी उपभोक्ता महासंघाच्या मार्फत व राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघामार्फत महाराष्ट्र,कर्नाटक,आंध्रप्रदेश बाजारपेठेमधून टोमॅटोची खरेदी करून, विविध राज्यांच्या विविध जिल्ह्यांच्या ठिकाणी पुरवठा करणेस सांगितले आहे. महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक होण्याची शक्यता गृहीत धरून, योग्य ती उपाययोजना केली जात आहे. महाराष्ट्र राज्यातील नारायणगाव व औरंगाबाद जिल्ह्याच्या परिसरातूनही टोमॅटोचा अतिरिक्त पुरवठा देखील होणार आहे. सध्याच्या परिस्थितीतील टोमॅटोचे गगनाला भिडलेले दर पाहून, केंद्र सरकारने त्यासाठी उपाययोजना करून, खरेदी करण्याचे राज्यांना आदेश दिलेले आहेत. दरम्यान ग्राहक संरक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघाला व राष्ट्रीय सहकारी उपभोक्ता महासंघाला,महाराष्ट्र,कर्नाटक, आंध्रप्रदेश राज्यातून टोमॅटो खरेदी करून,राज्यांच्या विविध जिल्ह्यात पुरवठा करणेस सांगितलेले आहे एकंदरीत नजीकच्या काळात टोमॅटोचे दर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.