जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
सांगलीत वडार समाज हा अत्यंत कष्ठाळू व भरीव योगदान देणारा समाज आहे. त्यांच्या मागण्या रास्त आहेत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज या समाजाने आयोजित केलेल्या मोर्च्यास व त्यांच्या रास्त मागण्यास सांगली कॉग्रेसचा जाहिर पाठिंबा आहे असे प्रतिपादन सांगली जिल्हा शहर कॉगेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केले. आज विश्रामबाग चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय सांगली असा मोर्चा वडार समाजाने आयोजित केलेला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ वडार समाजातील मोर्चेकयासमोर भर पावसात भिजत ते बोलत होते. त्यांच्या डोक्यावर एकाने छत्री धरताच, माझा कष्टाळू वडार समाज न्याय हक्कासाठी पावसात भिजत माझया समोर बसला असताना मला छत्री पेक्षा भिजण्यात अधिक आनंद आहे असे सांगुन पृथ्वीराज पाटील पुढे म्हणाले जात दाखला व जात पडताळणीवेळी सन 1961 चा पुरावा सादर करण्याची घातलेली अट रद्द किंवा शिथील करावी, पॅरामेडीकल व व्यवसाय प्रशिक्षण अभ्यासक्रमांना शैक्षणिक संस्थांमध्ये वडार समाजाला अनुसुचित जाती जमातीप्रमाणे फी सवलत मिळावी, 50 वर्षावरील दगडफोडीचे काम करणा-या महिलांना बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातुन दरमहा भरीव पेन्शन सुरू करावी व तांडावस्ती सुधार योजनेप्रमाणे वडार वस्ती सुधार योजना सुरू करावी या मागण्या रास्त असून शासनाने तातडीने त्या मान्य करून वडार समाजाला दिलासा दयावा अशी जोरदार मागणी पृथ्वीराज पाटील यांनी केली व महाराष्ट्रराज्य वडार सांगलीचे जिल्हा अध्यक्ष विनायक कलकुटगी यांना पाठिंब्याचे पत्र दिले.
यावेळी प्रदेश अध्यक्ष मुकुंद पोवार, जिल्हा अध्यक्ष विनायक कलकुटगी, अशुतोष कलकुटगी, राहूल सावंत, सुरेश कलकुटगी, श्रीराम अलाकुंटे, उमेश वडर, संदीप अलाकुंटे, दिपक वडर, राकेश कलकुटगी, अशोक पवार, राजू कलकुटगी, संदीप पवार, गणेश साळुंखे, संतोष वडर, आणि वडार समाजातील हजारो स्त्री पुरूष अबाल वृध्द मोर्चेकरी उपस्थित होते.