जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
कोल्हापुरात आज पहाटेपासून धुवांधार पाऊस सुरू असून, सकाळी 9:00 वाजता पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी 35 फूट 10 इंचावर गेली आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी 43 फुटापर्यंत असून, ती आणखी 4 फुटाने वाढल्यास, इशारा पातळीवर पोहोचणार आहे .कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वसाधारणपणे 68 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
राधानगरी धरण हे 6.13 टीएमसी भरले असून, काळमवाडी धरण 9.31टीएमसी भरले आहे. सद्यस्थितीत वारणा धरणातील पाणीसाठा 23 टीएमसी झाला आहे. दरम्यान कोल्हापुरात आज व उद्या अनुक्रमे यलो अलर्ट,व ऑरेंज अलर्ट जाहीर केला असून, संपूर्ण जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
ग्रीन अलर्ट मध्ये साधारणतः 65 मिलिमीटर पेक्षा कमी पाऊस पडतो.
येलो अलर्ट मध्ये साधारणत: 65 ते 115 मिली पाऊस पडतो.
ऑरेंज अलर्ट मध्ये साधारणतः 115 ते 204 मिलिमीटर पाऊस पडतो.
रेड अलर्ट मध्ये साधारणतः 204 मिलिमीटर च्या वरती पाऊस पडतो.