जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
सांगलीत आज दि. १४ जुलै २०२३ रोजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ना.डॉ. रामदासजी आठवले साहेब आज सांगली जिल्ह्यातील विवीध विकास कामांच्या उद्घाटनाकरीता सांगली जिल्हा दौर्यावर होते.
यावेळी रिपब्लिकन(आठवले) पक्षाचे मा. राज्यमंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. राजाभाऊ सर्वदे, सां.मि.कु. चे मा. महापौर तथा विद्यमान नगरसेवक व रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा. विवेकरावजी कांबळे, सां.मि.कु. शहर महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष नगरसेवक तथा रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संघटन सचिव मा. जगन्नाथदादा ठोकळे, सांगली जिल्ह्याचे खासदार मा. संजयजी पाटील, जतचे विद्यमान आमदार मा. विक्रम सावंत, राष्ट्रीय सचिव मा. सुरेश बारशिंग, युवक आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष मा. श्वेतभैया कांबळे, सांगली शहर जिल्हाध्यक्ष मा. पोपटभाऊ कांबळे, ना. आठवले साहेबांचे स्वियसहाय्यक मा. प्रविण मोरे, सांगली जिल्हाध्यक्ष मा. राजेंद्रजी खरात, सांगली जिल्हा कार्याध्यक्ष मा. संजयजी कांबळे, महिला जिल्हाध्यक्ष मा. छायादिदी सर्वदे, रोजगार आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष मा. अरूणभाऊ आठवले, विद्यार्थी परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा. सचिन सव्वाखंडे, आय.टी.सेलचे सांगली जिल्हाध्यक्ष मा. योगेंद्र कांबळे, मा. विशाल काटे, मिरज तालुकाध्यक्ष मा. अरविंद कांबळे, जत तालुकाध्यक्ष मा. संजय कांबळे पाटील, क.महाँकाळ चे तालुकाध्यक्ष मा. पिंटू माने, आटपाडीचे तालुकाध्यक्ष मा. धनंजय वाघमारे, तासगाव तालुकाध्यक्ष मा. प्रविण धेंडे, पलुस कडेगाव विधानसभा क्षेत्र अध्यक्ष मा. विशाल तिरमारे, आय.टी.सेलचे मिरज शहर अध्यक्ष मा. पृथ्वीराज रांजणे, इतर मान्यवर उपस्थित होते.
सांगली जिल्ह्यातील विवीध विकास कार्यांचे उद्घाटन करणेपुर्वी ना.आठवले साहेब सांगली जिल्ह्यामध्ये दाखल होताच रिपब्लिकन सांगली जिल्हा पक्षाचे वतीने फटाके वाजवून, शॉल अर्पण करून व पुष्पगुच्छ देऊन भव्य स्वागत करणेत आले.सर्वप्रथम जत येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पृर्णाकृती पुतळ्यास मा.ना.डॉ. रामदासजी आठवले साहेब यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले. जत येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह या वास्तुचे भुमीपुजन करून उद्घाटन करणेत आले. तसेच जत नगरपरिषद येथील ११० के.व्ही.ऐ. जत ते माजी नगराध्यक्ष मा. रविंद्र साळे यांचे मळ्यापर्यंतच्या रस्ते डांबरीकरण करण्याच्या कार्याचे उद्घाटन संपन्न झाले. मिरज शहारातील प्रसिद्ध डॉक्टर मा. हळींगळ्ळे यांचे निर्मल हॉस्पिटलचे रिबीनफीत कापून भव्य उद्घाटन करणेत आले. तसेच सांगली शहरात आयोजित भव्य चित्र प्रदर्शन मेळाव्याचे मा.ना.डॉ. आठवले साहेबांच्या हस्ते भव्य उद्घाटन संपन्न झाले.
यावेळी सांगली जिल्ह्यातून तसेच सोलापूर, सातारा जिल्ह्यातून रिपब्लिकन पक्षाचे सर्व पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते.