भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, यंदाच्या वर्षीचा लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे दिला जाणारा, "लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार" जाहीर.---

0


जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

(अनिल जोशी)

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, यंदाच्या वर्षीचा लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे दिला जाणारा, "लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार"जाहीर करण्यात आला आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे हे 41 वे वर्ष असून पुण्यातील मुकुंद नगर येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रांगणात  सदरहू कार्यक्रम 01 ऑगस्ट 2023 रोजी संपन्न होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्या जाणाऱ्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे असणार असून, लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सदरहू लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारात एक लाख रुपये  स्मृतिचिन्ह व मानपत्र आदींचा समावेश आहे .भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थ नेतृत्वाखाली आत्मनिर्भर भारत होण्यासाठी प्रगतीची घोडदौड चालू असून, भारत देश एका मोठ्या प्रगतीच्या उत्तुंग शिखरावर पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अमौलीक योगदानाचे कार्य लक्षात घेऊन, लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या विश्वस्तानी, यंदाच्या वर्षीच्या दिल्या जाणाऱ्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड केली आहे. 

दरम्यान लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट तर्फे दिल्या जाणाऱ्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार समारंभास, पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे एकाच मंचावर येणार असून, महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री अजित पवार, ट्रस्ट विश्वस्त सुशीलकुमार शिंदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ट्रस्टचे विश्वस्त रोहित टिळक यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top