भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स,अरब अमिरातीच्या दौऱ्यावर रवाना.--

0


जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

(अनिल जोशी)

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स व अरब अमिरातीच्या दौऱ्यावर रवाना झाले असून, दौऱ्याच्या प्रारंभी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यानुअल मॅक्रॉन यांच्या निमंत्रणावरून ते पॅरिसला भेट देणार आहेत. फ्रान्समध्ये शुक्रवारी बॅस्टिल डे परेडला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून,भारताच्या लष्कराचे तिन्ही दल यात सहभागी होणार आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या फ्रान्सचे प्रधानमंत्री एलिझाबेथ बॉर्न तसेच फ्रान्स संसदेचे अध्यक्ष गेरार्ड लारचर यांच्याबरोबर बातचीत करणार आहेत. दरम्यान संध्याकाळच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय समुदायाबरोबर संवाद साधून, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी आयोजित केलेल्या भोजन समारंभास उपस्थित राहतील. परवाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या बरोबर असलेल्या शिष्टमंडळ स्तरावर चर्चा होतील. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, फ्रान्समधल्या भारतीय कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर, त्याबरोबरच फ्रान्समधील प्रतिष्ठित व्यक्तींबरोबर चर्चा करतील. यंदाच्या वर्षी भारताच्या व फ्रान्सच्या या धोरणात्मक भागीदारीला 20 वर्षे पूर्ण होत असून, त्यानिमित्त शिक्षण, वैज्ञानिक, सांस्कृतिक इत्यादी क्षेत्रातही एकमेकांच्या सहयोगाच्या विस्तारीकरणावर भर दिला जाईल. 

दरम्यान दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात भारताताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, संयुक्त अरब अमिरातिचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांचे बरोबर द्विपक्षीय संबंधावर चर्चा करतील. भारत व यु.ए ई  दरम्यान ऊर्जा, शिक्षण ,आरोग्य सेवा ,अन्नसुरक्षा फिटनेस, संरक्षण आणि संस्कृती यासारख्या विविध क्षेत्रात, धोरणात्मक भागीदारी करण्यावर चर्चेचा भर राहणार आहे असे विदेश सचिव विनय कवात्रा यांनी सांगितले आहे. ऊर्जा ,शिक्षण, आरोग्य,अन्नसुरक्षा आदी विशेष बाबींवर तसेच कॉप 28 यासारख्या आंतरराष्ट्रीय विषयांवर देखील चर्चेचा भर राहणार आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top