कोल्हापुरात आज समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांची जोरदार एकमुखी मागणी,‘लॅण्ड जिहाद’ला प्रोत्साहन देणारा अन्यायकारी ‘वक्फ कायदा’ तत्काळ रद्द करा!

0


जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

(अनिल जोशी)

कोल्हापूरातील छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी, मुसलमान तथा अन्य समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कोल्हापूर येथे स्थापन केलेल्या ‘द मोहामेडन एज्युकेशन सोसायटी’ची कोट्यवधी रुपयांची संपत्ती बळकावण्याची प्रक्रिया वक्फ बोर्डाने चालू केली आहे. एकीकडे हिंदूंची मंदिरे सरकारीकरण करून मंदिरांची संपत्ती सरकार ताब्यात घेत आहे, तर दुसरीकडे ‘मुसलमानांची धार्मिक संस्था’ सरकार आणि नागरिक यांची संपत्ती कायद्याचा गैरवापर करत हडप करत चालली आहे. हा धर्मनिरपेक्षतेच्या संकल्पनेला सुरूंग असून हे असंवैधानिक आहे. एका मोठ्या षड्यंत्राद्वारे देशभरातील भूमी हडपण्याचा अतिशय गंभीर प्रकार वक्फ कायद्याच्या माध्यमातून चालू आहे. त्यामुळे ‘वक्फ बोर्डा’चे सर्व पाशवी अधिकार काढून घेऊन त्यावर सरकारचे नियंत्रण आणायला हवे आणि ‘लॅण्ड जिहाद’ला प्रोत्साहन देणारा अन्यायकारी ‘वक्फ कायदा’ तत्काळ रद्द करावा, अशी एकमुखी मागणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने करण्यात आलेल्या निषेध आंदोलनात करण्यात आले. हे आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक येथे 16 जुलैला सकाळी 11 वाजता करण्यात आले. या प्रसंगी भ्रष्टाचारविरोधी जनजागृती समितीचे प्रांत उपाध्यक्ष श्री. आनंदराव पवळ, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कोल्हापूर शहर कार्यवाह श्री. आशिष लोखंडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, शिवसेना करवीरतालुकाप्रमुख (उद्धव ठाकरे गट) श्री. राजू यादव आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी मनोगत व्यक्त केले.

 या प्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कोल्हापूर जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव, श्री. नितीन चव्हाण, बजरंग दलाचे हुपरी येथील श्री. सचिन माळी, हिंदु एकता आंदोलनाचे श्री. संदीप घाटगे, राष्ट्रहित प्रतिष्ठानचे श्री. शरद माळी, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री रामभाऊ मेथे, भीमराव पाटील, आदित्य कराडे, चण्डीगढ़, श्री. संजय कुलकर्णी, श्री. राजू तोरस्कर, श्री अंबाबाई भक्त समितीचे श्री. प्रमोद सावंत, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री किरण दुसे, मधुकर नाझरे, शिवानंद स्वामी, रणरागिणी शाखेच्या सौ. राजश्री तिवारी, सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे यांसह 12 हून अधिक संघटना-पक्ष यांचे 100 हून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते. 

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट म्हणाले, ‘‘वक्फ बोर्ड भूमी हडपणार ! यानंतर त्याची तक्रार ‘वक्फ’कडेच करायची आणि त्यापुढे जाऊन तपास वक्फच करणार अन् निवाडाही वक्फच देणार ! त्यामुळे येथे न्याय सोयीस्करपणे वक्फ बोर्डाच्या बाजूने देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वक्फ बोर्ड ही इस्लामी संस्था असूनही तिच्या सदस्यांना वक्फ कायद्यानुसार सरकारी नोकर मानले जाते. अशी सुविधा अन्य धर्मियांना वा धार्मिक संस्थांतील कोणत्याही सदस्यांना नाहीत. हा धार्मिक पक्षपाताचा कळस आहे.’’

या वेळी करण्यात आलेल्या मागण्या-

1. आतापर्यंत या कायद्याचा दुरुपयोग करत जी भूमी वक्फ बोर्डाने स्वतःची म्हणून घोषित केली आहे, ती भूमी मूळ मालकाला देण्याची व्यवस्था करण्यात यावी. त्यावरील वक्फ बोर्डाचा अधिकार पूर्णपणे संपुष्टात आणावा.

2. देशात ‘समान नागरी कायदा’ लागू करून अल्पसंख्यांकांच्या नावावर लागू करण्यात आलेल्या सर्व विशेष सुविधा, कायदे, आयोग, मंडळे, शासकीय विभाग संपुष्टात आणून सर्वांना समान वागणूक द्यावी.

 या प्रसंगी कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन ‘जनतेची भूमी हडपून ‘लँड जिहाद’ला प्रोत्साहन देणारा ‘वक्फ कायदा रहित करा’, ‘वक्फ बोर्डाने हडपलेल्या सर्व भूमी त्यांच्या मूळ मालकांना परत करा’, यासंह दिलेल्या अन्य घोषणांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक दणाणून गेला.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top