प्रसिद्ध ज्येष्ठ मराठी चित्रपट सृष्टीतील "देव" समजले जाणारे अभिनेते रवींद्र महाजनी यांचे आकस्मित निधन ,संपूर्ण मराठी चित्रपट सृष्टी शोक सागरात बुडाली. --

0


जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

(अनिल जोशी)

प्रसिद्ध ज्येष्ठ मराठी चित्रपट सृष्टीतील देव समजले जाणारे अभिनेते रवींद्र महाजनी यांचे आज शुक्रवारी तळेगाव दाभाडे जवळ आंबी गावाजवळ निधन झाले असून, त्यांच्या घरी ते मृताअवस्थेत सापडले आहेत. तळेगाव दाभाडे जवळील आंबी गावात राहत्या घरी त्यांचे 2-3 दिवसांपूर्वीच निधन झाले असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली असून, संपूर्ण मराठी चित्रपट सृष्टी, चित्रपटसृष्टीतील देव रवींद्र महाजनी यांच्या निधनाने शोकसागरात बुडाली आहे. प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार रविंद्र महाजनी यांचा मुलगा व अभिनेता गश्मीर महाजनी यांना पोलिसांनी कळवले असून, तो सध्या मुंबईत असून, माहिती मिळताच तो तळेगाव दाभाडे येथे रवाना झाल्याचे वृत्त आहे. पोलीस सूत्रांच्या प्राथमिक दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी  पाठवण्यात आला असून, शवविच्छेदनानंतर रवींद्र महाजन यांचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येणार असून, त्यांच्या मृत्यूचे  कारण स्पष्ट होईल. प्राथमिक मिळालेल्या शवविच्छेदनाच्या अहवालात, बॉडीवर कोणत्याही तीक्ष्ण खुणा नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असून, बॉडी बऱ्यापैकी डी कंपोज झाल्याचे म्हटले आहे.शवविच्छेदनाच्या अंतिम रिपोर्ट नंतर, रवींद्र महाजन यांचे पार्थिव शरीर कुटुंबीयांच्याकडे सुपूर्त करण्यात येईल, असे तळेगाव एमआयडीसीतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित सावंत यांनी स्पष्ट केले आहे. 

चित्रपटसृष्टीतील अभिनेते रविंद्र महाजनी हे गेले 8 महिन्यापासून एकटेच या घरात राहत होते . शेजारच्या व बाजूच्या रहिवाशांना फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याने पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर, फ्लॅटमध्ये ,चित्रपट अभिनेते रवींद्र महाजनी मृताअवस्थेत आढळले आहेत. चित्रपटसृष्टीतील देव समजले जाणारे अभिनेते रवींद्र महाजनी यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये अजरामर अशा भूमिका केल्या आहेत. मराठी चित्रपट सृष्टीत यापुढेही त्यांच्या भूमिका अजरामर अशा चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या लक्षात राहतील हे मात्र स्पष्ट करावेसे वाटते. संपूर्ण चित्रपट सृष्टीतील अभिनेते रवींद्र महाजन यांच्या आकस्मित निधनाने शोक सागरात बुडाली असून, संपूर्ण चित्रपट सृष्टीला दुःखद धक्का बसला आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top