जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्यात एकूण 1 लाखांपेक्षा अधिक लोक, डोळे येण्याच्या संसर्गजन्य साथीने त्रस्त झाले आहेत. महाराष्ट्र राज्यात ऍडमिनो वायरस मुळे ,डोळे येण्याचा संसर्गजन्य रोग पसरला आहे .सध्या पावसाळ्यातील हवामानात आद्रता जास्त प्रमाणात असल्यामुळे, डोळे येण्याची संसर्गजन्य साथ राज्यात वेगाने पसरली आहे. डोळ्यातील ओलाव्यामुळे डोळे येण्याचा संसर्ग ,बराच काळ शरीरात प्रभावित राहतो. शरीराला वारंवार घाम येऊन, चेहरा वारंवार पुसून ,डोळ्याला हात लावणे ,यामुळे या डोळे येण्याच्या संसर्गजन्य साथीला वाव मिळतो. महाराष्ट्रातील 31 जुलैपर्यंत च्या शासनाच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार ,जवळपास अंदाजे 1 लाखाच्या वर डोळे येण्याच्या संसर्गजन्य साथीने लोक प्रभावित झाले आहेत. राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये डोळे येण्याच्या संसर्गजन्य साथीने लोक प्रभावित झाले आहेत, ते जिल्हे खालील प्रमाणे:-
बुलढाणा- 13550 ,पुणे 8808,अकोला 6125,अमरावती 5538 ,धुळे 4743 ,जळगाव 4717,गोंदिया 4209 अशी रुग्ण संख्या असून ,31 जुलै अखेर राज्यात इतर जिल्ह्यात 88 हजार रुग्ण, डोळे येण्याच्या संसर्गजन्य साथीने प्रभावित झाले आहेत.
डोळे येण्याची लक्षणे--
डोळे लाल होणे, वारंवार पाणी येणे, , डोळ्याला सूज येणे ,डोळ्यातून चिकट पदार्थ बाहेर येणे ,डोळे खाजवणे ,डोळे जड वाटणे.
डोळे आल्यास काळजी घेण्याच्या सूचना--
डोळे नेहमी स्वच्छ पाण्याने वारंवार धुणे, डोळे पुसण्यासाठी स्वतंत्र रुमाल ठेवणे, डोळ्याला वारंवार स्पर्श न करणे, घराबाहेर जाताना गॉगल वापरणे,,आपल्या सभोवताचा परिसर स्वच्छ ठेवणे ,डोळे आलेल्या संसर्गजन्य साथीच्या परिसरात न जाणे, नियमित हात धुणे व नेत्रतज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध उपचार करणे.