जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
नागपूर मध्ये आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त, 15 ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा पदयात्रा काढली गेली असून, बगीचा ते शिवमंदिर उमरेड रोड व परत एस हॉस्पिटल येथे येऊन, नागपूर शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. प्रकाश ढगे यांचे हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. नागपूर शहरात आज शहर काँग्रेस उपाध्यक्ष डॉ. प्रकाश ढगे यांचे नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या तिरंगा पदयात्रेत, शहरातील स्वातंत्र्यप्रेमी नागरिकांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता.स्वागत समारंभाच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रकाश ढगे,तर प्रमुख अतिथी म्हणून गिरीश पांडव हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी गिरीश पांडव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रमुख अतिथी म्हणून असलेल्या गिरीश पांडव यांनी आपल्या भाषणात, देशातील सद्यस्थिती विशद करून, देशातील सांप्रदायिक शक्तीने डोके वर काढले असून, माणूस माणसाचा शत्रू होत असल्याचे सांगितले. अशा प्रसंगी स्वातंत्र्य दिन साजरा करून, स्वातंत्र्याच्या चळवळीत ज्यांनी आपले प्राणाअर्पण करून योगदान दिले आहे, त्यांच्या शिकवणीचा वारसा, यशोगाथेचा वारसा अंगीकारून, देशाच्या विकासासाठी कार्यतत्पर राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
नागपूर मधील एस हॉस्पिटल तर्फे माफक दरात, वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी याकरता ,श्री पांडव यांचे हस्ते एका ॲप्सचे लॉन्चिंग करण्यात आले आहे. नागपूर मधील तिरंगा पदयात्रेनंतर झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमाच्या व्यासपीठावर, प्रमुख अतिथी म्हणून प्रमोद घाडगे, मदन नागपुरे ,काशिनाथ जीवनकर ,यशोधर ताई फुलझेले ,रामचंद्र बोडसे ,सुरेश धनजोडे ,शामराव देवधरे, डॉ. प्रदीप गुप्ता ,डॉ.प्रमेय ढगे व ज्योतीताई ढगे उपस्थित होत्या .संपूर्ण लक्षवेधी ठरलेल्या पदयात्रेत ,भारत मातेच्या रूपात तनुश्री मळवंडे ,संध्या नगराळे व महात्मा गांधींच्या रूपात मारोतराव ढोबळे यांनी भूमिका साकारलेल्या होत्या .सदरहू कार्यक्रमात शाहीर विद्याताई सोलापूरकर व डॉ. शंकरराव भोंगेकर यांच्या वाद्यवृंदाने कार्यक्रमाची रंगत उत्तरोत्तर वाढत गेली .या स्वातंत्र्यदिनी अमृत महोत्सवी वर्षात, 15 ऑगस्ट रोजी झालेल्या तिरंगा पदयात्रेचे व ध्वजारोहण कार्यक्रमाचे संचालन वंदना कडू यांनी, तर आभार प्रदर्शन यश हॉस्पिटलचे संचालक डॉ.प्रकाश ढगे यांनी केले. सदरहू कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वश्री अरविंद मेश्राम ,विनोद बाळबुदे, प्राध्यापक रामेश्वर पाटेकर ,गजानन चौधरी ,अनिकेत ठाणेकर, वसंतराव शहाटे, गुंडू चौधरी ,अजय तितरमारे, किरण केवट यांचे अमोलिक सहकार्य लाभले.