जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
देशभरात संपूर्ण 169 शहरांमध्ये, इलेक्ट्रिक वर चालणाऱ्या बस गाड्या चालवण्यावर, केंद्रीय मंत्रिमंडळाने आज शिक्कामोर्तब केला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या झालेल्या निर्णयानुसार, देशामध्ये 169 शहरामध्ये इलेक्ट्रिक बस गाड्या चालवण्याच्या निर्णयाची माहिती आज केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी दिली.
देशात यापूर्वी झालेल्या 2011 च्या जनगणनेनुसार , 3,00,000 लोकसंख्या असलेली 169 शहरे ही निवडली असून, पंतप्रधान- ई-बस सेवा योजने अंतर्गत,सुमारे 57 हजार 613 कोटी रुपयांची इलेक्ट्रिक बस वाहतूक योजनेसाठी तरतूद केली असल्याची माहिती केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी दिली असून,यासाठी देशभरातील 169 शहरांमध्ये सुमारे 10,000 इलेक्ट्रिक बस गाड्या चालवण्यासाठी उपलब्ध होतील. आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार, 169 शहरांमध्ये इलेक्ट्रिक बस चालवण्याच्या निर्णयाने, पर्यावरणाच्या वायू व ध्वनी प्रदूषणाला निश्चितच आळा बसणार असून ,सुमारे 45 ते 60 हजार रोजगार निर्मितीचे लक्ष ठेवण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकुर यांनी दिली.