जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात नवीन प्रस्तावित 22 जिल्ह्यांची निर्मिती होणार असल्याचे समजत आहे. 01 मे 1960 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. सुरुवातीस महाराष्ट्र व गुजरात ही दोन्ही राज्ये एकत्रच होती, परंतु भाषिक प्रांतरचनेनंतर, गुजरात व महाराष्ट्र अनुक्रमे गुजराती व मराठी भाषेनुसार प्रदेशांची निर्मिती झाली व 01 मे 1960 ला विभाजन होऊन, महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. त्यावेळेला सुरुवातीस एकूण 26 जिल्हे म्हणजेच ठाणे, कुलाबा, रत्नागिरी, बृहन्मुंबई, नाशिक, धुळे, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर, बीड, परभणी, धाराशिव ,नांदेड ,बुलढाणा, अहमदनगर, अकोला ,अमरावती, नागपूर ,धुळे, पुणे ,सांगली, सातारा, कोल्हापूर, वर्धा ,यवतमाळ, जळगाव, भंडारा, चांदा असे 26 जिल्हे महाराष्ट्र राज्यात होते. त्यानंतर जवळपास 20 वर्षानंतर, आणखी 10 जिल्ह्यांची म्हणजेच सिंधुदुर्ग, जालना, लातूर, गडचिरोली,मुंबई उपनगर ,वाशिम, नंदुरबार ,हिंगोली ,गोंदिया, पालघर असे 10 जिल्हे भर पडून एकूण 36 जिल्ह्यांचे सध्याचे महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले.
सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्याच्या जिल्ह्यातील नागरिकांना आपल्या कामासाठी, जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागत असल्याने, नवीन जिल्ह्याच्या निर्मितीची प्रस्ताव करण्याचा, महाराष्ट्र शासनाचा विचार झाला असून, त्यानुसार प्रस्ताव तयार झाला आहे.
आता नवीन 22 प्रस्तावित निर्मिती होणाऱ्या जिल्हे खालील प्रमाणे. --
1)नाशिकमधून- मालेगाव, कळवण, 2)पालघर मधून -जव्हार, 3)अहमदनगर मधून- शिर्डी ,संगमनेर, श्रीरामपूर, 4)ठाण्यामधून - मीरा-भाईंदर, कल्याण, 5)पुण्यामधून- शिवनेरी, 6)रायगड मधून- महाड, 7)सातारा मधून -मानदेश, 8)रत्नागिरी मधून -मानगड, 9)बीडमधून- आंबेजोगाई, 10)लातूर -मधून उदगीर, 11)नांदेड मधून -किनवट, 12)जळगाव मधून- भुसावळ, 13)बुलढाणा मधून- खामगाव, अचलपूर, 14)यवतमाळ मधून- पुसद, 15)भंडारा मधून -साकोली, 16) चंद्रपूर मधून- चिमूर, 17)गडचिरोली मधून -अहिरे, असे 22 जिल्हे नवीन प्रस्तावित जिल्हा निर्मितीची केंद्रे म्हणून उदयास येणार आहेत. महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने, लोकसंख्येच्या दृष्टीने व राज्यातील नागरिकांना जिल्ह्याच्या ठिकाणी कामात जाण्याचे दृष्टीने,नवीन 22 जिल्ह्यांची प्रस्तावित निर्मिती झाली तर ,नागरिकांना शासकीय कामासाठी अत्यंत सोयीचे होणार आहे.