जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
महाराष्ट्राच्या शिवकालीन इतिहासातील मराठ्यांच्या अतुलनीय शौर्याच्या सुवर्ण गाथेवर सुवर्ण अक्षराने वर्णन असलेल्या, सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या कोंढाण्यावरील पराक्रमाच्या पार्श्वभूमीवर "सुभेदार" चित्रपट, येत्या 25 ऑगस्ट 2023 ला प्रदर्शित होणार आहे .कोंढाण्यावरील पराक्रमवीर तानाजी मालुसरे यांचा शिवकालीन इतिहास, मराठी चित्रपटातून आपल्यासमोर उलगडणार असून,पराक्रमवीर तानाजी मालुसरे यांची अभंग स्वामीनिष्ठा,दुर्दम्य आत्मविश्वास व त्याचबरोबर सूर्यासारख्या तळपणाऱ्या तलवारीची साथ, या सगळ्यांचे अवर्णनीय दर्शन, या चित्रपटातून आपल्याला होणार आहे."सुभेदार "या चित्रपटाच्या ट्रेलर गाण्यांमधून एकूणच चित्रपटाचा नजराणा, उत्कंठावर्धक व उत्साहवर्धक शिवप्रेमी रसिकांच्या हृदयात अगोदरच पोचला असून, आता फक्त देश विदेशातील व राज्यातील चित्रपट ग्रहांमध्ये, चित्रपट केव्हा प्रसिद्ध होतो ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.पराक्रम वीर तानाजी मालुसरे यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र सानिध्यात व्यक्तिगत आयुष्याच्या झालेल्या घडामोडीचे वर्णन, तानाजी मालुसरे यांच्या कुटुंबाने दिलेली तितकीच साथ याचे अलभ्यदर्शन, "सुभेदार" या चित्रपटात शिवप्रेमी रसिकांना होणार आहे.
पराक्रम वीर तानाजी मालुसरे यांच्या प्रसिद्ध होणाऱ्या "सुभेदार "या चित्रपटात मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर,समीर धर्माधिकारी,अभिजीत श्वेतचंद्र, स्मिता शेवाळे, उमा सरदेशमुख,अलका कुबल, दिगपाल लांजेकर, मृण्मयी देशपांडे,आस्ताद काळे, शिवानी रांगोळे, विराजस कुलकर्णी, अजिंक्य ननावरे, रिषी सक्सेना, नुपूर दैठणकर, अर्णव पेंढारकर, ज्येष्ठ दिग्दर्शक माननीय राजदत्त आदी मराठीतील दिग्गज कलाकारांचा या चित्रपटांमध्ये भूमिका व समावेश आहे.
सुभेदार या चित्रपटातील ,"मावळ जागं झालं र", "आले मराठी", "हळद लागली रायबाला", ही तीन गाणे सध्या महाराष्ट्राच्या चित्रपट क्षेत्रात, शिवप्रेमी रसिकांच्या काळजाला भिडली आहेत व गाजत आहेत.चित्रपट "सुभेदार" याचे संगीतकार देवदत्तबाजी असून, सुवर्णा राठोड देवदत्त बाजी, अवधूत गांधी ,रोहित राऊत, निधी हेगडे आदी गायकानी गाण्यास स्वरसाज चढवला आहे. ए .ए .फिल्म्स आणि एंटरटेनमेंट ची प्रस्तुती असलेल्या "सुभेदार" चित्रपटाची निर्मिती राजा वारसा प्रोडक्शन, मुळाक्षर प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड ,पृथ्वीराज प्रोडक्शन्स, राजाऊ प्रोडक्शन्स, परंपरा प्रोडक्शन सियानी केली आहे. प्रज्योत पेंढारकर, अनिल वरखडे ,दिपाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर ,श्रमिक गोजमगुंडे, विनोद जावळकर ,शिवभक्त आणि अनिकेत जावळकर, श्रुती दौड हे चित्रपटाचे निर्माते आहे.