जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
विश्वातील अवकाश संशोधनात चंद्र ग्रहाचे रहस्य उलगडणाऱ्या भारताच्या चंद्रयान -3 ची,चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याच्या मोहिमेची सुवर्ण अक्षराने इतिहासात नोंद झाली असून,भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे की ज्याने, चांद्रयान -3 च्या सफल मोहिमेने चंद्रावरील दक्षिण ध्रुवावर उतरण्याच्या मोहिमेत सफल झाला आहे.विश्वातील संपूर्ण जगाचे लक्ष आज,भारतीय अवकाश संशोधन केंद्र म्हणजेच इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणाऱ्या चांद्रयान -3च्या मोहिमेकडे लागले होते.
आज भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 06 वाजून 04 मिनिटांनी भारताचे चांद्रयान-3,चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरले.ज्या घटनेची संपूर्ण देशवासीय व जगातले अवकाशप्रेमी,जगभरातले अवकाश शास्त्रज्ञ वाट बघत होते. आजच्या क्षणाची, विश्वाच्या अवकाशातील चंद्र ग्रहाचे संशोधनात्मक रहस्य उलगडणाऱ्या इतिहासात, सुवर्ण अक्षरांनी नोंद झाली. आज भारताचे चांद्रयान -3 मोहिमेचं लँडर मोड्यूल, भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी 06 वाजून 04 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले.आज सकाळपासूनच चांद्रयान -3 मध्ये विक्रम लेंडर च्या आतमध्ये असलेल्या प्रज्ञान रोव्हर च्या लँडिंगसाठी,बंगळूर मध्ये इस्रोच्या मिशन संकुलात असंख्य शास्त्रज्ञांची जय्यत तयारी सुरू होती. भारताच्या चांद्रयान -3 च्या सफल चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याच्या मोहिमेमुळे, अनेक आंतरराष्ट्रीय सहकार्य कराराची नांदी झाली असल्याचे मत अणुऊर्जा व अवकाश राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंग यांनी म्हटले आहे.भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी,आजच्या सफल झालेल्या चांद्रयान -3 च्या मोहिमेबद्दल,भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रातील शास्त्रज्ञ म्हणजेच इस्रोचे कौतुक केले आहे.भारतातील नागरिकांनी आज सर्वच ठिकाणी,चांद्रयान -3च्या सफल झालेल्या मोहिमेबद्दल,एकच जल्लोष करून,मिठाई वाटून, इतिहासातील सुवर्ण अक्षरांनी लिहिलेला सुवर्णक्षण साजरा केला.