जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
सर्वोच्च न्यायालयात आज जम्मू आणि काश्मीर या राज्याला विशेष दर्जा देणाऱ्या संविधानातील 370 कलम रद्द करण्याला आव्हान देणाऱ्या सर्व याचिकांवर, आजपासून, सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायाधीशांच्या घटनापिठासमोर दैनंदिन सुनावणी सुरू होत आहे. देशातील सर्वोच्च न्यायालयात, जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना कायदा 2019 च्या तरतुदी रद्द करण्याला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका दाखल झाल्या होत्या. यासाठी सर्वोच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायाधीशांचे घटनापीठ स्थापन करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या संविधानातील कलम 370 रद्द करण्याला आव्हान देणाऱ्या सर्व याचिकांवर आजपासून सुनावणी सुरू होत आहे. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्यांच्या वतीने जेष्ठ विधीज्ञ कायदे पंडित कपिल सिब्बल हे बाजू मांडणार आहेत. संपूर्ण देशाचे या सुनावणीकडे लक्ष लागून राहिले आहे .जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या कलम 370 रद्द करण्याला आव्हान देणाऱ्या सर्व याचिकांवर ,सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापिठासमोर काय निर्णय होतो? हे देशाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे.