जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
केंद्र सरकारने संपूर्ण देशात 6 लाख 40 हजार गावांमध्ये, ब्रॉडबँड नेट संपर्काच्या व्यवस्थेसाठी, सुमारे 1 लाख 39 हजार 579 कोटी रुपयांचे वाटप केले आहे .त्याचबरोबर केंद्र सरकारने संपूर्ण देशात, गावागावांमध्ये ब्रॉडबँड नेट संपर्क स्थापन करण्याचे व विस्तारीकरण करण्याचे, येत्या 2 वर्षात उद्दिष्ट असल्याचे, दूरसंवाद मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.संपूर्ण देशात 60,000 ग्रामपंचायतीमध्ये, गेल्या 8 महिन्यांमध्ये, हा ब्रॉडबँड नेट संपर्क व्यवस्थेचा कार्यक्रम राबवला होता.
संपूर्ण देशात आता ब्रॉडबँड नेट संपर्काचे विस्तारीकरण करण्याचा निर्णय, नुकताच दूरसंवाद मंत्रालयाने घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्याच्या परिस्थितीत देशात ब्रॉडबँड नेट संपर्क सुमारे 1 लाख 94 हजार गावात पर्यंत पोहोचला असून ,सुमारे 5 लाख 67 हजार घरांमध्ये, ब्रॉडबँड नेट संपर्काची जोडणी चालू आहे. दूरसंवाद मंत्रालयाने घेतलेल्या विस्तारीकरणाच्या प्रकल्पामुळे, 2.5 लाख नोकऱ्या उपलब्ध होणार असून, मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत, ब्रॉडबँड नेट संपर्क प्रकल्प राबवणारा भारत हा, जगातील पहिलाच देश ठरणार आहे.
भारत संचार निगम लिमिटेड द्वारे हा प्रकल्प पूर्णपणे राबवला जात असून, देशातील संपूर्ण ग्रामीण भागात याचे विस्तारीकरण होणार आहे. एकंदरीतच देशातील ग्रामीण गावागावांमध्ये ब्रॉडबँड नेट संपर्क यंत्रणेच्या विस्तारीकरणामुळे, भारताचे जगामध्ये अव्वल स्थान निर्माण होण्यास मदत होणार आहे.