जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
नवी दिल्लीत आज 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली असून,रॉकेट्री द नंबी इफेक्ट या आर माधवन दिग्दर्शित असलेल्या चित्रपटाला,सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे सुवर्णकमळ जाहीर झाला आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार निखिल महाजन यांना, "गोदावरी "या मराठी चित्रपटाबद्दल जाहीर झाला असून, डॉ. सलील कुलकर्णी दिग्दर्शित "एकदा काय झालं" हा मराठी चित्रपट सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अल्लू अर्जुन याला पुष्पा द राईज या चित्रपटासाठी जाहीर झाला असून, सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार आलिया भट्ट हिला "गंगुबाई काठीयावाडी" तर क्रिती सेनान हिला "मिमी" या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
नॉन पिक्चर फिल्म प्रकारात "एक था गाव" सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला असून, पल्लवी जोशी या अभिनेत्रीस सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार ,काश्मीर फाइल्स या चित्रपटासाठी काम करण्यात आल्याबद्दल देण्यात आला आहे. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार पंकज त्रिपाठी यांना "मिमी" या चित्रपटात काम केल्याबद्दल जाहीर झाला असून, लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार "आरआरआर "या चित्रपटास मिळाला आहे.नर्गिस दत्त पुरस्कार"द काश्मीर फाइल्स "या चित्रपटास जाहीर झाला असून,पर्यटन-निर्यात-हातमाग -उद्योगाचा प्रसार करणाऱ्या चित्रपट विभागामध्ये,हेमंत वर्मा दिग्दर्शित "वारली आर्ट "या चित्रपटास सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळाला आहे.कौटुंबिक मूल्ये जपणाऱ्या प्रतिमा जोशी दिग्दर्शित "चंदसांसे" या चित्रपटाला पुरस्कार मिळाला असून, "रेखा" सिनेमाला विशेष जुरी पुरस्कार देण्यात आला आहे.