सांगलीत दि.9 ऑगस्ट 2023 वार बुधवार रोजी, "क्रांती दिनानिमित्त" सकाळी 8:00 वाजता ,क्रांतीज्योत पदयात्रा निघणार.---

0


जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क 

(अनिल जोशी)

सांगलीत दिनांक 9 ऑगस्ट 2023 वार बुधवार रोजी, क्रांती दिनानिमित्त, क्रांतीज्योत पदयात्रेचे आयोजन केले असून, ही पदयात्रा सकाळी ठीक 8:00 वाजता सांगलीतील महात्मा गांधी पुतळा स्टेशन चौक येथून निघणार आहे व हुतात्मा स्मारक मार्केट यार्ड येथे या क्रांतीज्योत पदयात्रेची सांगता होणार आहे. दि. 9 ऑगस्ट 2023 वार बुधवार रोजीच्या क्रांती दिनाच्या निमित्ताचे औचित्य साधून, देशातील क्रांतीकारकांचे देशप्रेम ,त्याग आणि बलिदान याचे स्मरण होण्यासाठी व वंदन करण्यासाठी, क्रांतीज्योत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. क्रांतीज्योत पदयात्रेनंतर ध्वजारोहणाचा कार्यक्रम ,कार्यक्रम स्थळी होऊन, स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार समारंभ होणार आहे. दि. 9 ऑगस्ट 2023 रोजी क्रांती दिनानिमित्त निघणाऱ्या क्रांतीज्योत पदयात्रेचे निमंत्रक आमदार विक्रम सिंह सावंत, अध्यक्ष सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी व पृथ्वीराज गुलाबराव पाटील ,अध्यक्ष सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी हे असून, निघणाऱ्या क्रांतीज्योत पदयात्रेत सांगली जिल्ह्यातील व शहरातील नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top