जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या 9 ऑगस्ट 2023 रोजीच्या आझाद मैदान मुंबई येथील एक दिवशी आंदोलनाच्या संदर्भात सांगली मराठा क्रांती मोर्चा व मराठा समाज यांच्या वतीने मराठा सेवा संघ सांस्कृतिक भवन येथे नियोजन बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करून सुरुवात झाली.सांगली जिल्ह्यातील मराठा बांधवांनी मुंबई येथील आंदोलनाला हजारोंच्या संख्येने पाठिंबा देण्यासाठी जावे असे आवाहन करण्यात आले. त्याकरिता तालुका पातळीवर व गाव पातळीवर नियोजन करण्याचे ठरले.मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसोबतच मराठा आरक्षण 50 टक्के च्या आत ओबीसी प्रवर्गातूनच मिळाले पाहिजे व तोपर्यंत ओपन मध्ये संरक्षण ही प्रमुख मागणी करण्याचा ठराव करण्यात आला.
या बैठकीला विविध मराठा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.यामध्ये डॉ.संजय पाटील,सतीश साखळकर, नितिन चव्हाण,अनंत सावंत, पंडितराव पाटील, विश्वजीत पाटील ,राहुल पाटील,दिपक मोरे ,योगेश पाटील,अमित देसाई,प्रशांत सुर्यवंशी,अशोकभाऊ कोकळेकर, देवजी साळुंखे,श्रीरंग पाटील, दिपक राडे ,विश्वास यादव, सतीश लवटे आदी उपस्थित होते.