जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्यात यंदा पावसाच्या अभावामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात कमालीची कमतरता जाणवत असल्यामुळे भविष्यात राज्यात पाणीटंचाई सामोरे जावयाची शक्यता वाटत असल्याचे निदर्शनास आले आहे. राज्यातील कोयना, जायकवाडी, उजनी आदी प्रमुख धरणांमध्ये, यंदाच्या वर्षी पाणीसाठा पावसाअभावी व्यवस्थित झाला नसल्याचे दिसत आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व धरणे येत्या भविष्यकाळात, पावसाअभावी भरतील का नाही ? याबाबतीत प्रश्नचिन्ह उभारले आहे. राज्यात एकूण लहान व मोठी अशी मिळून 2994 धरणे आहेत. राज्यातील यंदाच्या वर्षी धरणातील पाणीसाठा हा जवळपास 55% ते 60% च्या दरम्यान असल्याचे दिसत आहे .कोयना धरणात सध्याच्या स्थितीत कोयना धरणात 78% टी.एम.सी.,उजनी धरणात 13% टी.एम.सी.,खडकवासला धरणात 77% टी. एम.सी.,भाटघर धरणात 84% टी.एम.सी.,जायकवाडी धरणात 34% टी. एम.सी .तर वैतरणा धरणात 77.% टी. एम.सी.इतका पाणीसाठा प्रमुख असलेल्या धरणांमध्ये आहे. राज्यातील सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी, जवळपास 550 टी.एम.सी. च्या वर पाण्याची आवश्यकता आहे. राज्यातील इतर लहानसहान धरणांमध्ये जवळपास सध्याच्या स्थितीत 94% टी.एम .सी.पाणीसाठा आहे.
भारतीय हवामान खात्याच्या सध्याच्या अंदाजानुसार, राज्यात पुढील काळात अपेक्षित असलेला पाऊस होणार नसल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.त्यामुळे महाराष्ट्र राज्याला भविष्यात,पावसाच्या अभावामुळे पाणीटंचाईच्या लक्षणांना सामोरे जाण्याची चिन्हे दिसत आहेत.